दिवसभरात आठ पॉझेटिव्ह, सात जणांना डिस्चार्ज
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
जिल्ह्यात आज (दि.19) दिवसभरात आठ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. यात सात महिला आणि एक पुरुष आहेत. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले सात जण ‘पाझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली.
शुक्रवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये दारव्हा येथील एकूण सात जण तर आर्णी येथील एक जण आहे. दारव्हा येथील 67 वर्षीय पुरुष तसेच 25, 25, 34, 58, 40, 55 वर्षीय महिलांचा समावेश आहे. तर आर्णि येथील महिला 55 वर्षांची आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 50 होती. यात सात जणांना सुट्टी झाल्यामुळे ही संख्या 43 झाली. मात्र आज नव्याने आठ पॉझेटिव्ह वाढल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 51 वर पोहचली आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 33 जण भरती आहे. शुक्रवारी महाविद्यालयाने 51 नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 3302 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 3080 प्राप्त तर 219 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 214 वर पोहचली आहे. यापैकी 156 जण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे आठ रुग्णांच्या मृत्युची नोंद होती. मात्र मूळचे अकोला येथील रहिवासी असलेले व यवतमाळ येथे मृत झालेल्या व्यक्तिची नोंद अकोला येथे झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्युचा आकडा एकने कमी होऊन सात वर आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले.
०००००००