यवतमाळ : एका कोरोना बाधिताचा मृत्यू ; मृत्यू संख्या ३ वर पोहचली
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
नेर येथील ८३ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.सदर व्यक्तीला सारीचे लक्षणे होती या व्यक्तीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आज प्राप्त झाला .वैद्यकीय महाविद्यालयात आज सकाळपासून ३५ रिपोर्ट प्राप्त झाले असून यातील वरील मृतक व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर उर्वरित ३४ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे .
आयसोलेशन वार्ड मध्ये भरती असलेल्या दोन जण “पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह” झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सध्या स्थितीत ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह संख्या २२ असून आतापर्यंत १४३ जण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १६८ पॉझिटिव झाले असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तीनवर पोहोचली आहे.