धक्कादायक : कोरोना च्या रूग्ण संख्येत भारत जगात चौथ्या क्रमांकावर भारताने कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत ब्रिटनला टाकलं मागे,
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
भारतातील कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. जगभरातील कोरोनाबाधितांच्या यादीत भारत आता चौथ्या क्रमांकावर असून भारताने ब्रिटनला मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतात कोरोनाचे २ लाख ९७ हजार ८३२ रुग्ण आढळले आहेत. तर ८ हजार ४९८ जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच आतापर्यंत १ लाख ४६ हजार ६६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
भारतात सर्वाधित कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने वुहानला मागे टाकले आहे. गुरुवारी महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे ३ हजार ६०७ नवे रुग्ण आढळले असून १५२ जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९७ हजार ६४८ झाली असून मृतांची संख्या ३ हजार ५९०वर पोहोचली आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या एकट्या मुंबईत कोरोनाचे ५३ हजार ९८५ रुग्ण आढळले आहेत.
देशात महाराष्ट्राच्या पाठोपाठ सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या राज्यात आढळले आहे. तमिनाळडूत ३८ हजार ७१६, दिल्लीत ३४ हजार ६८७ आणि गुजरातमध्ये २२ हजार ६७ कोरोनाबाधित रुग्ण आहे.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….