काँग्रेसला 55 वर्षांत जे जमले नाही, ते भाजपने 5 वर्षांत केले : नितीन गडकरी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
काँग्रेस सरकारला 55 वर्षांत ज्या गोष्टी जमल्या नाहीत, त्या केवळ 5 वर्षांत करण्याची कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने केली आहे, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. गडकरी यांनी व्हर्च्युअल जनसंवाद रॅलीच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
गडकरी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने राष्ट्रवादाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. मोदी सरकारने माओवादी आणि दहशतवाद्यांवर वेळोवेळी कारवाई करुन हे दाखवून दिले आहे. देशातील लांगुलचालनाचा काळ आता संपला आहे.माओवादी आणि दहशतवाद्यांवर सरकारकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे.मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या राष्ट्रवादाला महत्व देण्यात येत आहे. व्होट बँकेचे राजकारण आता कमी होत आहे. कलम 370 रद्द करुन सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. याचबरोबर राम मंदिराची उभारणीतील अडथळे आता दूर झाले आहेत. भाजपने कधीही विचारसरणीपासून फारकत घेतलेली नाही, असे गडकरी यांनी सांगितले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….