महागाव : शहरात तीन रुग्ण आढळल्याने एकूण पाच प्रभाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित
प्रशासनाने घेतला महत्वपूर्ण निर्णय ; बाजारपेठ ठप्प ;
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
कोरोना बाधित सराफा व्यवसायिकाच्या मृत्युनंतर हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील महागाव शहरातील तीन तरुण संशयित रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सदर तीन रुग्ण अनुक्रमे प्रभाग १,७ व १० मधील आहेत,त्यामुळे महागाव शहरात कोरोनाने प्रवेश झाल्याचे स्पष्ट आहे.त्यामुळे या परिसरातील एकूण पाच परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महागाव तहसील आरोग्य व नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे.त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ ठप्प झाली आहे.
कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या साधू नगर येथील सराफा व्यवसायीकाचे प्रतिष्ठाण महागाव येथे असल्याने सदर मृतकाच्या संपर्कात अनेकजण आल्याने आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे. हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील १३ जणांना कोविड-१९ केअर सेंटर येथे संस्थात्मक विलगीकरण दाखल करण्यात आले होते. त्यातील चार जणांना कोरोना चे लक्षणे आढळून आल्याने तात्काळ त्यांना गुरुवारी रात्री १० वाजता यवतमाळ येथील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले .त्यांचे स्वॅब घेऊन तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह चाचणी प्राप्त झाल्याने महागाव तालुक्यात चिंतेत भर पडली .त्यामुळे महागाव शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या क्षेत्रातील परिसर सील करण्यात आला आहे.तालुका प्रशासनाने शहरातील एकूण पाच प्रभाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक १, ७, ८, ९, १० चा समावेश करण्यात आला आहे.
तर या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. आरोग्य यंत्रणेने कसून चौकशी सुरू केली असून पाचही प्रभाग मधील घरोघरी जाऊन अशा सेविकांनी सकाळपासून मोबाईल व्हॅनद्वारे प्रत्येक घरातील सदस्यांची माहिती घेतली आहे . कुणाला कोरोनाचे लक्षणे आढळून येतात का याचीही खबरदारी आरोग्य यंत्रणेच्या आशा सेविकांनी हाती घेतली आहे. पाचही प्रभागांमध्ये प्रतिबंध क्षेत्रात पोलीस तैनात करण्यात आले आहे. काल आढळलेल्या ३ तरुणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याकारणाने आता त्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील निकटवर्तीय व कौटुंबिक सदस्य यांची यादी आरोग्य,महसूल आणि नगरपंचायत प्रशासनाने तयार केली असून टप्प्याटप्प्याने संशयित म्हणून त्यांना महागाव येथील मागासवर्गीय मुलीचे वस्तीगृह अर्थातच कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्याची प्रक्रिया महसूल व आरोग्य यंत्रणेने सुरु केली आहे. तहसीलदार निलेश मडके,नायब तहसीलदार डॉ.संतोष अदमुलवाड ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जब्बार पठाण,वैद्यकीय अधिकारी डॉ.बिपिन बाभले,नगरपंचायत मुख्याधिकारी सूरज सुर्वे, व तिन्ही विभागातील कर्मचारी यांनी सकाळ पसुनच याकडे लक्ष घातले आहे .मिळालेल्या माहितीनुसार तीन जणांच्या संपर्कात जवळपास १०० लोकांची नावे यादीत असल्याची माहिती आहे.
या पाच प्रभागातील ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले :
प्रभाग क्रमांक १, ७ ,८, ९,१० या परिसरातील नगरपंचायत ,स्टेट बँक एटीएम, पुसद ट्रॅव्हल्स पॉईंट तहसील समोरील बिकानेर व जनता प्लास्टिक पुसद अर्बन बँक,ताज गादी कारखाना, जुन्या बसस्थानकावरील बाजारपेठ कडे रस्ता या वर्दळीच्या रस्त्यावरील प्रभाग क्रमांक १, ७ ,८, ९,१० मध्ये जाणारे मुख्य रस्ते बॅरिकेट्स लावून प्रतिबंधित करण्यात आले आहे प्रत्येक ठिकाणी पोलीस व गृहरक्षक दलाच्या मदतीने सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.