अखेर “मनसे-भाजप” युतीवर शिक्कामोर्तब होणार…? ; वर्षा बंगल्यावर बैठक…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आगामी निवडणुकांमध्ये नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भाजपसोबत युती होण्याच्या चर्चा रंगत असतात. सध्या राज्यात असलेल्या राजकीय परिस्थितीमुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चेला चांगलाच जोर मिळतोय.
यंदाच्या निवडणुकीत ‘मनसे’ची भाजपसोबत युती होणार असून, महायुतीत समावेशाने ‘मनसे’ला राज्यात दोन जागाही मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर ‘मनसे’कडून वर्धापनदिनाच्या माध्यमातून नाशिक लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाऊन आले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येणार यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. सध्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुरु आहे.
महायुतीच्या बैठकीसाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय वर्षा बंगल्यावरील बैठकीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. लोकसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. पण, आजच्या बैठकीत जागावाटपावर अंतिम निर्णय होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आजच्या बैठकीवर लागून आहेत.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच टप्प्यात होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 25 पैकी 23 जागांवर विजय मिळवला होता, तर त्यांचा तत्कालीन सहयोगी – अविभाजित शिवसेनेने – त्यांनी लढवलेल्या 23 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या. अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी आघाडीचा भाग म्हणून 19 जागा लढवल्या होत्या आणि चार जिंकण्यात यश मिळविले होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..