“ठाकरे गटांचे नेते निवडणुकीत आपल्याला मदत करतील” शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या दावा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. सर्व पक्ष प्रचारामध्ये गुंतले आहेत. नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. अशात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक करत ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील आपल्याला मदत करतील, असा दावा केला आहे.
यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. संतोष बांगर यांनी यावेळी राहुल गांधींवर टीका केली आहे.
संतोष बांगरांची राहुल गांधींवर टीका
हादगाव येथील संवाद मिळत बोलताना आमदार संतोष बांगर यांनी हातवारे करून राहुल गांधीवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. शिंदे गटाच्या वतीने आज संवाद मिळण्याचे आयोजन हादगाव येथे येथे करण्यात आले होते. यावेळी देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे सक्षम नेतृत्व लाभला आहे त्यांचे विरोधात माणूस आहे का असं म्हणत बांगर यांनी शरीराचे हाताचे हावभाव करत अप्रत्यक्षरीत्या राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
‘सुभाष वानखडे आपल्याला मदत करतील’
संतोष बांगर यांनी यावेळी अजब दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ठाकरे गट (Thackeray Group) माजी खासदार सुभाष वानखडे (Subhash Wankhede) आपल्याला मदत करतील, असा दावा बांगर यांनी केला आहे. माजी खासदार सुभाष वानखडे, माजी आमदार जयप्रकाश मुंदडा आपलंच काम करतील. ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याबद्दल आमदार बागर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. हिंगोली, वसमत, कळमनुरी आणि हदगाव विधानसभेतून 50 -50 हजाराची लीड देणार असंही बांगर यांनी म्हटलं आहे.
नागेश पाटील अष्टीकरांवर गंभीर आरोप
नोकरी लावतो म्हणून अनेक लोकांकडून पैसे घेतले, असं म्हणत नागेश पाटील अष्टीकरांवर नाव न घेता आमदार बांगर यांनी गंभीर आरोप केले आहेत. दोन तीनशे लोकांपासून पैसे घेतले. ग्रामसेवक करतो 5 लाख, आरोग्य सेवा करतो 10 लाख, तलाठी करतो 20 लाख, आता फक्त कलेक्टर करायचं बाकी आहे. दंडावर थाप देण्यासाठी मसल लागतात. नागेश पाटील आष्टीकर डोम्या नाग आहेत. नागोबाच्या नादी लागू नका, असं म्हणत बांगर यांनी नाव न घेता नागेश पाटलांवर टीका केली आहे.
संतोष बांगरांच्या दाव्याने चर्चांना उधाण
हिंगोलीतून येऊन दंड थापटत होता, तुला दंड कसा थापटतात माहित आहे का, असा सवालही त्यांनी विचारला आहे. माजी खासदार सुभाष वानखडे यांच्या आशीर्वाद आपल्यासोबत आहेत. त्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. महत्त्वाचं म्हणजे सुभाष वानखडे सध्या शिवसेान ठाकरे गटात आहेत. त्यामुळेच बांगर यांनी केलेल्या या दाव्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.
कळमनुरी, वसमत, हिंगोली आणि हादगाव या विधानसभेतून 50-50 हजाराच्या वर लीड देणार, 2024 च्या विधानसभेला आपल्याला बाबुराव कदम उमेदवार पाहिजे. तिकीट आपलाच आहे, उमेदवार आपलाच आहे. नरेंद्र मोदीचं काम पाहिलं की अंगावर शहारे उभे राहतात पण तिकडून माणूस नाही, असं म्हणत बांगरचे शरीर आणि हाताचे हातवारे करत राहुल गांधी यांच्या अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….