BCCI कडून खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस बीसीसीआयने केली आहे. प्रत्येक वर्षी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआय चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावं पाठवत असते. २०१९ विश्वचषकात ५ शतकांसह केलेली धडाकेबाज कामगिरी आणि याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये केलेलं दमदार पुनरागमन यामुळे बीसीसीआयने खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.याव्यतिरीक्त अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा यांची नावं बीसीसीआयने सुचवली आहे. काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमराहचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी शर्यतीत होतं.मात्र अखेरीस सिनीअर खेळाडूंसोबतच्या शर्यतीत त्याचं नाव मागे पडलंय. २०१८ सालीही शिखरचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं होतं. मात्र अंतिम यादीत त्याची निवड झालेली नव्हती. त्यामुळे यंदाच्या वर्षात कोणत्या खेळाडूची मानाच्या पुरस्कारासाठी निवड होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!