यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना चा पहिला बळी ; नागापुरातील ‘त्या ‘कोरोना बाधित महिलेचा मृत्यू ; उपविभागीय अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी दिले होते निवेदन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
प्रशांत भागवत(९४२२८६७७४८)
उमरखेड :
तालुक्यातील नागापुर (प)येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेचा यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान शनिवारी आज सकाळी मृत्यू झाला. ही महिला काही दिवसापूर्वी मुंबईवरून आली होती. गावातील शाळेत संस्थात्मक विलगीकरणात असताना तिचा स्वाब तपासणीला पाठविला होता. काल शुक्रवारी ती पॉझिटिव्ह असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाचा हा पहिला मृत्यू आहे.
या मृत्यूने प्रशासन व आरोग्य यंत्रणा हादरली आहे, नागापूर( प,) येथील कोरोना बाधीत महिलेचा शनिवारी मृत्यु झाला ती कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट होताच मुंबईचे 27 लोक व गावातील तब्बल 44 लोक प्रशासनाने ताब्यात घेवुन मरसूळ येथे कोरणटाईन केले आहेत. इतर संसर्गित लोकांचा शोध सुरू आहे.
सदर महिला १९ मे रोजी मुंबईवरून आपला नवरा व मुलांसह येथे आली होती. त्यांना गावाच्या शाळेतच ठेवण्यात आले होते. परंतु दरम्यानचे काळात तीला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने उमरखेड येथील एका खासगी रुग्णालयात तसेच पुसद येथे सुद्धा उपचारासाठी गेली होती. परंतु पुसद येथेआरोग्य तपासणी केल्यानंतर ती पाॅजिटिव्ह नमुना मिळाल्याने यवतमाळ येथे जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वार्डात भरती करण्यात आले होते. दरम्यान आज सकाळी त्याठिकाणी तिचा मृत्यू झाला या घटनेमुळे नागापूरसह उमरखेड परिसर चांगलेच हादरले आहे.
विशेष म्हणजे विलगीकरणात असतांनाही सदर महिलेच्या संपर्कात गावातील जवळपास 45 लोक संपर्कात आल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे त्याचबरोबर सोबतच्या सत्तावीस लोकांनाही प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवली आहेत. या घटनेमुळे कोरोना संसर्ग फैलावु नये याकरिता स्थानिक उपविभागीय स्तरावरील प्रशासन फारसे गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. उमरखेड थील आरोग्य यंत्रणेसह स्थानिक पातळीवरील समिती तालुका प्रशासन यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सदर महिलेच्या संपर्कातील विलगीकरणात असलेल्या नागरीकांच्या रिपोर्ट कडे आता गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान प्रशासनाने गुरुवार पासूनच संपूर्ण नागापूर गाव सिल केले आहे.
‘त्या’ पुर्वकल्पनेला उपविभागीय अधिकारी यांनी गाभिर्याने घेतले असते तर! नागापुरात कोरोना संसर्ग फैलावू नये म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन चा पूर्णपणे फज्जा उडाला आहे कोणत्याही नियमांचे पालन होत नसल्याबाबत नागापूर चे माजी सरपंच गजानन कदम,उत्तमराव जाधव इंदल आडे यांनी दोन मे रोजी स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन गावातील स्थितीबाबत पूर्वकल्पना देऊन अवगत केले होते परंतु या निवेदनाला उपविभागीय अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे सदर कोरोना बाधित महिलेचे वेळेवर निदान व योग्य उपचार मिळू शकले नाही. परीणामी तिचा मृृृत्यु झाला. आता गावात तिचे संपर्कातील व नंतर त्यांचे संपर्कातील असे किती गावकरी असतील? या कल्पनेने नागापुरकर हादरले आहे.