बाबासाहेब नाईक सूतगिरणीच्या अध्यक्षपदी राजेश आसेगावकर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव
बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणी मर्यादित पिंपळगाव चे अध्यक्ष पदाचा डॉक्टर एन. पी. हिराणी यांनी दिनांक 31 जानेवारी ला राजीनामा दिला त्यांचा राजीनामा 25 फेब्रुवारी 2020 रोजी संचालक मंडळाने मंजूर केला त्यानंतर अध्यक्षपद रिकामे झाले मध्यंतरीच्या काळात कोरना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सूतगिरणीचे अध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया लांबविण्यात आली होती.
सूतगिरणीचे अध्यक्षपदी ययाती नाईक यांची निवड होऊन उपाध्यक्षपद महागाव तालुक्याला दिले जाईल असा तर्क लावला असताना आज अचानक माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी राजेश आसेगावकर चे नावाचा व्हीप सादर केला त्यामुळे राजेश मधुकरराव आसेगावकर यांची बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी गिरणीचे 20 संचालकांपैकी 19 संचालक हजर होते डॉक्टर एन. पी. हिराणी हे प्रकृती चांगली नसल्यामुळे गैरहजर राहिले. अध्यक्षपदाच्या निवडीचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सुनील भालेराव सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुसद यांनी कामकाज पाहिले तसेच यावेळी गिरणीचे कार्यकारी संचालक एम आय पातरी तसेच प्रशासकीय अधिकारी म्हणून अजय राठोड हजर होते अध्यक्ष निवडीच्या वेळी सोशल डिस्टन्स वापरण्यात आले.