वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी जितेंद्र आव्हाड अडचणीत, पुणे, शिर्डीत गुन्हे दाखल…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देशभरात वादंग उठल्यानंतर आव्हाड यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांना हे वादग्रस्त वक्तव्य चांगलंच भोवलं असून त्यांच्याविरोधात पुणे आणि शिर्डीत गुन्हे दाखल झाले आहेत. शहर भाजपच्यावतीने याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी (भारतीय दंड संहिता कलम २९५ – अ ) हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शिबिरात आव्हाड यांनी आपल्या भाषणात “प्रभू श्रीराम हे वनवासात असताना मांसाहार करत होते.” अशा स्वरूपाचे वादग्रस्त व समाजात तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक वक्तव्य त्यांनी केलं होतं.
दरम्यान धीरज घाटे यांनी दिलेल्या फिर्यादीत, जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना वादग्रस्त वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्याचा कार्यक्रम आहे, या पार्श्वभूमीवर आक्षेपार्ह वक्तव्य करून आव्हाड यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखविल्या आहेत. आक्षेपार्ह व प्रक्षोभक वक्तव्य करून जनतेच्या भावना दुखविल्याने आव्हाड यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे,असे घाटे यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….