बापानेच तीन वर्षांच्या चिमुकल्याला विकले, आईच्या जागरुकतेमुळे उघड झाला घटनाक्रम…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
आर्णी :- जन्मदात्या बापानेच तीन वर्षांच्या चिमुकल्याची तेलंगणातील निर्मल येथे विक्री केली. हा प्रकार आईच्या लक्षात आल्यानंतर तिने स्वत: गावात जाऊन खातरजमा केली व नंतर आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
त्यावरून पोलिसांनी संशयितांपैकी काहींची धरपकड केली. मुलाला कुठे विकले याचा शोध पोलिस घेत आहेत.
जय श्रावण देवकर (३) असे चिमुकल्या मुलाचे नाव आहे. तो श्रावण दादाराव देवकर (३२, रा. कोपरा) यांच्यासोबत राहत होता. तर श्रावणचा त्याची पत्नी पुष्पा हिच्याशी वाद होता. पती सतत मारहाण करीत असल्याने त्याच्या जाचाला कंटाळून पुष्पा यवतमाळ येथील नातेवाइकांकडे वास्तव्याला होती. मुलगा जय याची विचारपूस करण्यासाठी ती कोपरा येथे गेली असता, गुरुवारी हा प्रकार लक्षात आला. तिने दिलेल्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी श्रावण देवकर, चंद्रभान देवकर, कैलास गायकवाड, बाल्या बोबडे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील काही संशयितांना ताब्यात घेतले. एकाला सोबत घेऊन पोलिस पथक तेलंगणात रवाना झाले. मुलाला कुठल्या कारणाने कशासाठी विकले याचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेने मात्र तालुक्यात खळबळ उडाली आहे. आर्णी ठाणेदार केशव ठाकरे यांना तपासाबाबत विचारणा केली असता, त्यांनी अधिक माहिती देण्याचे टाळले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….