सुनील केदार यांचा मुक्काम कारागृहातच, पुढील सुनावणी होणार ९ जानेवारीला…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये १५० कोटींपेक्षा जास्त रकमेचा सरकारी रोखे खरेदी घोटाळा करणारे माजी मंत्री सुनील केदार यांचा कारागृहातील मुक्काम सध्या जैसे थे आहे. नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी बुधवारी राज्य सरकारला नोटीस बजावून केदार यांच्या शिक्षा, निलंबन व जामीन अर्जावर येत्या ६ जानेवारीपर्यंत लेखी उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आणि या प्रकरणावर ९ जानेवारीला पुढील सुनावणी निश्चित केली.
२२ डिसेंबर २०२३ रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने केदार यांना विविध गुन्ह्यांतर्गत दोषी ठरवून कमाल पाच वर्षे सश्रम कारावास व एकूण १२ लाख ५० हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर केदार यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात दाखल केलेला अर्ज ३० डिसेंबरला फेटाळण्यात आला. परिणामी, केदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ते गेल्या २८ डिसेंबरच्या रात्रीपासून मध्यवर्ती कारागृहात कैद आहेत. शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सात दिवस मेडिकलमध्ये उपचार घेतले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….