“वंचित आणि ठाकरे गटाच्या 12-12 फॉर्मुल्याचे आम्ही बारा वाजवू”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष नेते प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली आहे. वंचित आणि ठाकरे गटाच्या 12-12 फॉर्मुल्याचे आम्ही बारा वाजवू, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे आज धुळे शहरात आले असता शासकीय गुलमोहर विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वंचित आणि ठाकरे गटाची युती झालेली आहे की नाही आपल्याला माहित नाही मात्र प्रकाश आंबेडकरांना युती करायची असेल तर ती महाविकास आघाडी सोबत करावी लागेल ठाकरेंसोबत नाही. त्यांचा जो 12- 12 चा फॉर्म्युला ठरला आहे तो अतिशय योग्य असून आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केली.
छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटलांन वाद मिटवावा : आठवले
मराठा समाजाला आरक्षण देणे म्हणजे सगळ्याच मराठा समाजाला आरक्षण देणे असा त्याचा अर्थ होत नाही. संपूर्ण ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही ज्यांचे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्यांना आरक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे मराठा समाजाला देखील आर्थिक निकषांच्या आधारावर आरक्षण मिळावे अशी मागणी म्हणून जरांगे पाटील यांची आहे. छगन भुजबळ हे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करीत आहेत त्याला आमचा पाठिंबा आहे. सगळ्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी अजिबात नसून गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला आमचा पाठिंबा आहे. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यातील वाद मिटवावा तसेच मराठा समाजाच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.
2024 ची निवडणूक आम्हीच जिंकणार : आठवले
2024 च्या निवडणुकीत आम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही, इंडिया आघाडीने आम्हाला किती हरवण्याचे प्रयत्न केले. इंडिया आघाडीला आम्हाला हरवण्याचा अधिकार असला तरी सुद्धा आमचाच विजय होईल. मतदार जनता त्यांच्या बाजूने गेली तरच आम्ही हरवू शकतो. मात्र मतदार जनता आमच्या सोबत असल्यामुळे आमचा हरण्याचा प्रश्नच येत नाही असा आत्मविश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..