गौळ खु. येथे काँग्रेस पक्षाच्या जनसपंर्क कार्यालयाचे उदघाटन ; जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू :- झिया शेख…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथून जवळच असलेल्या गौळ खु. येथे काल दि.1 जानेवारी रोजी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास वाघमारे यांच्या पुढाकाराने पक्षाच्या जनसपंर्क कार्यालयाचे उदघाटन जिल्हा काँग्रेस सचिव अनिल दत्तराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष कृष्णा धावस होते . प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. गजानन देशमुख जिल्हा सचिव, झिया शेख अध्यक्ष पुसद शहर काँग्रेस, अमजद खान अल्प. जिल्हा उपाध्यक्ष , अभिलाष खैरमोडे विधानसभा प्रमुख ह. भ. प. भागोराव शीरडे महाराज ,तंटा मुक्ती अध्यक्ष उत्तमराव ढोले, सेवा निवृत्त तहसीलदार वाकोडेसाहेब , अल्पसंख्याक अध्यक्ष नन्हे खान, सोशल मीडिया प्रमुख रहेमान चौव्हाण,माजी.पं स. सदस्य मधुकर राठोड,माजी युवक अध्यक्ष आरिफ गुड्डू, जब्बार लाखे, सय्यद जानी, वाजीद खान,सादिक ठेकेदार,सरदार खान हे होते.
यावेळी गौळ सर्कलचे रहिवासी ह. भ. प. भागोराव शीरडे यांना नुकतेच महाराष्ट्र आदिवासी विभाग तर्फे आदिवासी सेवक पुरस्कार देऊन शासनाने सम्मानित केल्याबद्दल पक्षा तर्फे शाल, श्रीफळ देऊन त्यांचे सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या सत्कारीय उत्तरात सांगितले की, आजची राजकीय परिस्थिती ही अतिशय विचलित झाली आहे आज जनतेने विषारी सरकार पासून सावध राहून एक मताने काँग्रेस पक्षाला सत्तेत आणण्यासाठी तय्यार राहावे. मला काँग्रेस पक्षाने जेव्हा हाक दिली तेव्हा मी शेवट पर्यंत काँग्रेस पक्षाला एक जनमाणूस म्हणून साथ देईल अशी भावना व्यक्त केली.
उदघाटनीय कार्यक्रमात ऍड. गजानन देखमुख यांनी पक्ष संघटन वाढी करिता कार्यकर्त्यांनी नेहमी तय्यार रहावे आम्ही एका जोमाने पक्ष संघटन तयार करून पुसदच्या जनतेची सेवा करू असे सांगितले.
पुसद शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष झिया शेख यांनी आपल्या मनोगतात प्रथम गौळ वासियांचे मनापासून आभार मानले .गौळ वासि्यांनी काँग्रेस पक्षावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कधी कमी पडू देणार नाही, पक्ष नेहमी आपल्या सोबत उभा राहील. या नंतर आम्ही पुसद विधानसभा मध्ये प्रत्येक सर्कल मध्ये सपंर्क कार्यालय स्थापन करून जनतेच्या समस्या सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले.सदर कार्यक्रमात विभागा तील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता हे विशेष.मान्यवराच्या मनोगता नंतर राष्ट्रगीताने कार्यकर्माची सांगता झाली.
कार्यक्रमाचे संचलन तालुका काँग्रेस अध्यक्ष विलास वाघमारे यांनी तर आभार माजी सरपंच आंनदा रणमले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कमल बाई रनमले माजी सरपंच,आंनदा रणमले, नितीन धनवे, जगदीश राठोड, फुलाजी कुरुडे, काशिनाथ रणमले, सुरेश महाराज, गजानन राठोड, बाबाराव जवादे, फकिरा गायकवाड, ध्यानेश्वर चौव्हाण,सहाई राठोड,किसन खंडारे यांनी अथक परिश्रम घेतले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..