नागपूर येथे स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी होत असलेल्या आमरण उपोषण समर्थनार्थ वणी येथे रस्ता रोको आंदोलन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वणी (यवतमाळ) :- विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मिती साठी विदर्भ योद्धा ॲड वामनराव चटप व इतर कार्यकर्ते 27 डिसेंबर 2023 पासून नागपूर येथील संविधान चौकात आमरण उपोषणाला बसलेले आहे तसेच ॲड सुरेश वानखेडे व मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हा कार्यालयासमोर सुद्धा ॲड चटप साहेब यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषन सुरू आहे सतत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषण मुळे काही कार्यकर्त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मिती साठी व विदर्भवादी नेते ॲड वामनराव चटप साहेबांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी वणी येथे रेल्वे फाटकावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.ज्यामुळे काही काळ रस्ता वाहतूक बंद झाली आंदोलकांनि आक्रमक पवित्रा घेतल्यानी काही काळापुरते तणावाचे वातावरण निर्माण झाले परंतु पोलीस प्रशासनाच्या वतीने तत्काळ डीटेंड करण्यात आले या आंदोलनात प्रा पुरुषोत्तम पाटील,बाळासाहेब राजूरकर,राजू पिंपलकर,देवराव धांडे, दशरथ पाटील,अजय धोबे, नामदेव जनेकर,मुक्तानंद भोंगळे,संदीप गोहोकर,होमदेव कणाके,देवा बोबडे,कलाबई क्षीरसागर,धीरज भोयर,दिनेश रायपूरे,राकेश वराटे,अलका मोवाडे,दत्ता डोहे,संकेत खीरटकार,मंगल तेलंग,अक्षय कवरासे,रितेश बलकी,कृष्णराव भोंगळे,आयुब शेख,मजुषा तिरपुडे,कमलेश भगत,संजय सोमलकर,शशिकांत बोढे,काशिनाथ देऊळकर,प्रभाकर वुईके, सुमनताई जनेकार,बेबीताई पिंपलशेंडे,सुषमा पाटील,नितेश तुरानकर,सुजित गाताडे,चंद्रकांत दोडके,मारोती मोवाडे यासह विदर्भवादी उपस्थित होते