पुसद येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी “भीम टायगर सेना” च्या वतीने १ जानेवारीला कार्यक्रमाचे आयोजन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भिम टायगर सेना पुसद तालुका व शहर च्या वतीने भीमा कोरेगाव शौर्यदिन याही वर्षी साजरा करण्याचे आयोजित केले आहे तरी समस्त बहुजन बांधवांना सुचित करण्यात येते की नियोजित कार्यक्रम प्रथम सत्र सकाळी ठीक अकरा वाजता एक जानेवारी शूरवीरांना भव्य मानवंदना रॅलीचे आयोजन सकाळी 11 ते पाच पर्यंत करण्यात आले आहे तसेच सायंकाळी ठीक सहा वाजता मुख्य कार्यक्रम मानवंदना या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक दादासाहेब शेळके संस्थापक अध्यक्ष भिम टायगर सेना कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ राजेश वाढवे. प्रमुख अतिथी प्राचार्य डॉक्टर प्रशांत वासनिक डेरी अँड टेक्नॉलॉजी वरुड कॉलेज विनोद दादा फुलमाळी विदर्भ अध्यक्ष विनोद शेंडे विदर्भ अध्यक्ष कामगार सेना तसेच तसेच धम्म क्रांती प्रज्ञा पर्व 2023 सर्व समिती डॉ मोहम्मद नदीम , शितल वानखेडे व इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीमशाहीर युवा गायक स्वप्नील मेश्राम आणि संच नागपूर यांचा शौर्य दिनावर व तसेच भीम गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी समस्त बहुजन बांधवांनी हजारोंच्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे तालुका अध्यक्ष प्रभाकर खंदारे तसेच शहराच्या वतीने करण्यात येत आहे.