“अॅट्रॉसिटीच्या गुन्हयातून आरोपींची निर्दोष मुक्तता” ; पुसद येथील जिल्हा व सत्र न्यायालय श्रीमती मखरे मॅडम यांचा महत्वपुर्ण निर्णय ; अॅट्रॉसिटीच्या गुन्हयातून आरोपीची निर्दोष मुक्तता…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- अॅट्रॉसिटीच्या प्रकरणातील आरोपी सचिदानंद चौधरी, श्रीकांत चौधरी, प्रवीण चौधरी, सुदर्शन चौधरी,
आनंदराव ठाकरे, किशोर ठाकरे, अशोक चौधरी, यांची
निर्दोष मुक्तता दिनांक २९.१२.२०२३ रोजी पुसद येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती मखरे मॅडम यांनी केली आहे.
घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी नारायण नामदेव वाढे हा पिंपळगांव मुंगशी येथील रहिवासी असून, दिनांक १६.०९.२०१२ रोजी त्याचे घरासमोर मोकळ्या जागेत निळ्या रंगाचा झेंडा
लावलेला होता. तो घटनेच्या दिवशी आरोपी यांनी संगनमत करून तेथुन काढला
व त्या खुल्या जागेवर कंम्पाउंड करण्यास सुरवात केली. त्यावेळी झेंडा काढल्यामुळे फिर्यादी व इतर साक्षदारांनी आरोपीस जाब विचारला असता, यातील आरोपींनी फिर्यादी नारायण नामदेव वाढे, राजु देविदास वाढे यांना मारहाण करण्यास सुरवात केली.
त्यांना वाचविण्याकरिता आलेलया सुमन शंकर मनवरहिला यातील आरोपी दिगांबर याने पोटात कुशा मारून ढकलले तसेच सौ. रेखा दिलीप वाढे हिला विनोद चौधरी यांनी विळा मारून जखमी केले व जातीवाचक शिवीगाळ केली. सदरची घटना झाल्यानंतर फिर्यादी याने पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे आरोपी विरूध्द तक्रार दिली. त्यां नी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरूध्द १४७, १४९, ३२३, ३२४, २९४, ५०६ भा.दं.वि. व कलम ३(१)(३)(१०) अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गतचा गुन्हा नोंद झाला.
अॅट्रॉसिटीचा गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे वि.न्यायालयात ५ प्रत्यक्षदर्शी साक्षदार व इतर ९ एकूण १४ साक्षदार तपासण्यात आले. व आरोपींना अॅट्रोसिटीच्या गुन्हयात शिक्षा देण्याबाबतचा युक्तिवाद केला.
आरोपीचे वतीने आरोपीचे वकील ॲड. आदित्य माने (पाटील) यांनी सदरचे प्रकरण हे अॅट्रॉसिटीचे नसून, आरोपींच्या मालकी हक्काच्या जागेवर बेकायदेशिररित्या झेंडा अज्ञात व्यक्तींनी लावला होता व आरोपी त्यांच्या स्वतःच्या मालकी हक्काच्या जागेत कंमाउंड करण्याकरिता गेले असतांना यातील फिर्यादी व इतर साक्षदार यांनी त्यांना अडथळा निर्माण केला व बेकायदेशिररित्या आरोपींची जमिन बळकाविण्याचा प्रयत्न फिर्यादी व ईतर साक्षदारांनी केल्याचा युक्तिवाद वि.
न्यायालयात केला. तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षदारांच्या बयाणात व इंन्जुरी रिपोर्ट मध्ये
दोन्हीही पक्षांचा विसंगती असल्याबाबत चा युक्तिवाद वि. न्यायालयात केला.
युक्तिवाद ग्राहय धरून पुसद येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती मखरे मॅडम यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सर्व आरोपींच्या वतीने युवा विधीज्ञ ॲड आदित्य माने पाटील यांनी काम पाहिले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..