मुंबईतील ३ मैदाने आम्हालाच लागतील, सरकारही परवानगी देईल ; मनोज जरांगेंनी व्यक्त केली अपेक्षा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत 20 जानेवारी रोजी उपोषण करणार असल्याची घोषणा केली. मुंबईत या उपोषणावेळी ३ कोटी मराठा आंदोलक येईल, असा दावा देखील जरांगे यांनी केला आहे.
त्यानंतर ओबीसी समाजानेही २० जानेवारीला आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. मात्र, याचदरम्यान जरांगे यांनी मुंबईत आम्हाला तीन मैदाने लागतील. त्यासाठी सरकारही परवानगी देईल,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे म्हणाले, ‘मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळांनी मुंबईतील मैदानांची पाहणी केली आहे. त्यानंतर मुंबईत जाणाऱ्या मराठा आंदोलकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे आम्हाला तीन मैदाने लागतील. मुंबईतील शिवाजीपार्क, बीकेसी आणि आझाद मैदान हे तीन मैदाने लागतील. मात्र, आमरण उपोषण हे आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क या दोन्ही पैकी एका मैदानात होईल’.
जरांगे पाटील फडणवीसांवर काय म्हणाले?
‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल आम्हाला राग नाही आहे. ते मराठा आरक्षणासाठी काम करत आहेत,असं स्पष्टीकरण जरांगे यांनी दिलं.
दरम्यान, मनोज जरांगे हे येत्या 4 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत गोदा पट्ट्यातील 123 गावांचा दौरा करणार आहेत. यावेळी ते मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांशी गाठीभेटी करणार आहेत.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….