हुडी येथील”त्या” महिलेचा सुध्दा रिपोर्ट कोरोना पॉजिटिव्ह ; सदर महिला त्या कुटुंबातीलच
कोरोना बाधितांची संख्या पुन्हा ७ वर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
पुसद तालुक्यातील हुडी येथील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्यानंतर आज पुन्हा, हुडी येथील संस्थात्मक विलागिकरण कक्षामध्ये भरती असलेल्या महिलेचा रिपोर्ट नव्याने पॉजिटिव्ह आला आहे. सदर महिला पहिले कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आहे.हा रिपोर्ट आज (ता.१९) रोजी रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे . त्यामुळे जिल्ह्यात एक्टिव पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा ७ वर गेली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाला रात्री १६ रिपोर्ट्स प्राप्त झाले. यापैकी १ पॉजिटिव्ह आणि १५ नेगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या शतक पूर्ण करून १०१ वर गेली असून यापैकी ९४ जण बरे होऊन घरी गेले आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
( last update दिनांक – १९ मे, वेळ – रात्री ११: १५ मी)

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…