काँग्रेस-ठाकरे गटात जागा वाटपावरून जुंपली ; दावे-प्रतिदावे, संजय राऊत २३ जागांवर ठाम…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात जागा वाटपावरून दावे-प्रतिदावे केले जात असून, यावरून दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. तर शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीत २३ जागा लढवणारच, असा दावा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केला आहे.
पक्ष फुटीवरून जागावाटप ठरत नाही. पक्ष फुटूनही शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष असल्याचे विधान संजय राऊत यांनी केले होते. लोकसभेला आम्ही २३ जागा लढलो होतो. त्यातील १८ जागांवर विजय मिळवला होता. संभाजीनगरमध्ये थोडक्या मतांनी पराभव झाला.
शिवसेनेकडे किती मते हे सांगणे कठीण-निरुपम
काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. २०१९च्या निवडणुकीतील संदर्भ आता चालणार नाहीत. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात जे काही घडले, ते दुर्भाग्यपूर्ण आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेकडे नेमकी किती मते आहेत. हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे जागांबाबत दावा करणे चुकीचे असल्याचे निरूपम म्हणाले. जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही, हे ‘मविआ’त ठरले आहे. काँग्रेसची ताकद असलेल्या जागा त्यांना मिळणार, यावर हायकमांड आणि आमचे एकमत झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुणी वक्तव्य करत असेल, तर त्याकडे फार गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….