मोबाईलच्या वादात मुलाने केला जन्मदात्या बापाचा खून
पॉलिटिक्स पेशल लाईव्ह
अनिल बोम्पीलवार
हिवरा संगम (तालुका महागाव)
येथे दुपारी दोनच्या सुमारास आपल्या सोळा वर्षीय मुलाने आपल्या राहत्या घरी मोबाईल चार्जिंगला लावला होता. सदर मोबाईल शरद चे वडील सुभाष हरिभाऊ ठाकरे वय५० यांचा मोबाईल चार्जिंगला असलेला मोबाईल काढला व मुलगा काहीच काम करत नाही व केवळ मोबाईल च्या नादी असतो म्हणून रागारागाने फोडून टाकला तो मोबाईल फोडून टाकला ही बाब मुलगा सत्या (नाव बदलून) याच्या लक्षात येताच त्याचा राग अनावर झाला.बाप व लेकाचे कडाक्याचे भांडण झाले भांडणाचा परिणाम हाणामारीत होऊन मुलाने वडिलांना बेदम मारहाण करून बाजीच्या ठाव्याने जोरदार प्रहार वडिलांच्या डोक्यावर केले तेव्हा वडील रक्ताच्या थारोळ्यात खाली पडून त्याच्या जागीच अंत झाला.
वडिलांचा मृत्यू होऊनही मुलाचा राग कमी झाला नव्हता अंगणामध्ये तुराट्या ची गंजी पेटवून त्या गंजीवर वडिलांचा मृतदेह टाकण्यासाठी तयारी सुरू केली परंतु गंजी पेटवन्या करता त्याच्याजवळ माचिस नव्हती तो माचीसच्या शोधात असताना ही बाब गावात असलेल्या सुभाष च्या भावाला कळाली तेव्हा त्याने लगेच घटनास्थळी धाव घेऊन सत्य ला दोरीने बांधून ठेवले आणि घटनेची माहिती पोलीस पाटील प्रवीण कदम व महागाव पोलिसांना कळविली घटनेची माहिती मिळताच ठाणेदार यांनी हिवरा येथे धाव घेऊन घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीकरिता पाठवले व आरोपीला ताब्यात घेतले. मुलगा हा गावातीलच एका ट्रकवर क्लीनर चे काम करतो गेल्या दोन महिन्यापासून तो बेकार होता सदर घटना ही दादाजी नगर च्या झोपडपट्टी मधील आहे. अवघ्या बारा हजार रुपयाच्या मोबाईल साठी राग अनावर होऊन वडिलांचा खुन होणे हि सुन्न करणारी घटना बापलेकाच्या पवित्र नात्याला भेग पाडणारी आहे.