यवतमाळ ब्रेकिंग : जिल्ह्यात एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ४५ वरून ७ वर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
“पॉझेटिव्ह टू नेगेटिव्ह” आणखी ३८ लोकांना सुट्टी
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझेटिव्ह रिपोर्ट्स आलेले ३८ लोक, १४ दिवसाच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या ३८ पैकी ३ जणांना संस्थात्मक विलागिकरण कक्षात ठेवण्यात येणार असून उर्वरित ३५ जण गृह विलागिकरणात राहणार आहे. जिल्ह्यात आता एक्टिव पॉझिटिव्हची संख्या ४५ वरून ७ वर आली आहे. विशेष म्हणजे २४, २५ आणि ३६ एप्रिल या दरम्यान सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडली. त्यानंतर रुग्ण वाढीचा वेग कमी झाला असला तरी एक-दोन, एक-दोन पॉझिटिव्ह रुग्ण येणे सुरू होते. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा पाहता पाहता ९८ वर गेला होता. यापैकी तब्बल ९१ जणांना बरे करण्यात आरोग्य विभागाला लक्षणीय यश आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
सुरवातीला केवळ यवतमाळ शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते, मात्र नंतर नेर आणि उमरखेड़ (मौजा धानोरा) येथे पॉझेटिव्ह रुग्ण आल्याने चिंतेत भर पडली. उमरखेड़ येथील पॉझेटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व हाय रिस्क व लो रिस्क अशा ६८ लोकांचे नमूने तपासनिसाठी पाठविले. हे सर्व रिपोर्ट्स नेगेटिव्ह आले आहे. तसेच नेर येथील हाय रिस्क व लो रिस्क अशा ७६ जणांचे रिपोर्ट्स तपासनिसाठी पाठवले असता यापैकी ३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ७३ रिपोर्ट्स नेगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
उमरखेड़, महागाव, नेर आणि सर्व यवतमाळ जिल्ह्यसाठी ही अतिशय समाधानाची बाब आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….