धनकेश्वर ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी शोभाताई धुमाळ यांची अविरोध….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पुसद शहरालगतच्या धनकेश्वर ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर नवनियुक्त सदस्यांची पहिली बैठक आज दिनांक ४ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत उपसरपंचपदी ज्येष्ठ सदस्या शोभाताई धुमाळ यांचे अविरोध निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच मोहम्मद सादिक जिया उलहक हे होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार श्री विवेक इंगोले यांनी काम पाहिले. सचिव श्री गरड यावेळी उपस्थित होते.
या ग्रामपंचायतीवर काँग्रेस नेते डॉ. मोहम्मद नदीम यांचे पॅनल निर्विवाद पणे निवडून आले. सरपंच पदी त्यांचे भाचे मोहम्मद सादिक हे विजयी झाल्यानंतर उपसरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून होती. या पदासाठी ग्रामपंचायतच्या स्थापनेपासूनच सदस्य म्हणून निवडून येणाऱ्या बेबीनंदा काळे व शोभाताई धुमाळ यांचे पैकी एकास संधी मिळेल याची चर्चा होती. त्याप्रमाणे शोभाताई धुमाळ यांना यावेळी संधी देण्यात आली. तथापि धुमाळ यांचे सोबतच सतीश पडघने व सुनीता पुंडे यांचेही उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते, मात्र चर्चेनंतर या दोघांचे अर्ज मागे घेण्यात येऊन शोभाताई धुमाळ यांची खेळीमेळीच्या वातावरणात अविरोध निवड करण्यात आली.
या बैठकीनंतर सरपंच उपसरपंचासह सर्व सदस्यांनी काँग्रेस नेते व ग्रामपंचायतचे मार्गदर्शक डॉ. मोहम्मद नदीम यांचे निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी भावी कामकाजा साठी डॉ. नदीम यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या बैठकीला श्री उत्तमराव मस्के सर, विजय काळे, शेख करीम (कालुबाई), सय्यद कलीम, शेख सलीम भाई, शेख रहीम, सय्यद अफसर मोमीन, शेख रहेमान, दत्तात्रय निळकंठे ,अजय धुमाळ, शेख अन्सार, श्री मुनेश्वर काका आणि फैय्याजुद्दीन खतीब ,मुसद्दीक सर हे प्रामुख्याने उपस्थित होते.