“सीमावर्ती भागातील पराभव भाजपने बघावा ; उलटगिनती महाराष्ट्रातूनच सुरू होईल”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- तेलंगणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यातील महाराष्ट्राला लागून असलेल्या मतदारसंघाचा निकाल एकदा भाजपने बघावा. सीमावर्ती भागात भाजपला झटका बसला असून काँग्रेस विजयी झाले आहे.
या निकालावरून महाराष्ट्रात काय होऊ शकते याचा अंदाज भाजपला येईल. तीच लहर महाराष्ट्रात आहे. लकवरच महाराष्ट्रात मोठे परिवर्तन झाल्याचे देशाला बघायला मिळेल. भाजपची उलटगिनती महाराष्ट्रातूनच सुरू होईल, असा दावा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला.
पटोले म्हणाले, जनमताच्या आम्ही आदार केला आहे. या निकालानंतर कुठे त्रुटी राहिल्या याचे अवलोकन केले जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. या निकालाने आम्ही खचणार नाही. उलट २०१८ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी चारही राज्यात काँग्रेसची मते वाढली आहेत. याचा लोकसभेत फायदाच होईल. ‘इंडिया’ आघाडीबाबत कुणीही काहीही चर्चा केली तरी फरक पडत नाही. काँग्रेस तडजोड न करणारा पक्ष आहे. काँग्रेस सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी आहे. आतापासूनच राज्यात भाजपचे सरकार येईल आणि वानखेडे स्टेडियमवर शपथ घेऊ असे कुणी म्हणत असेल तर हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचा अद्याप भाजपने योग्य विचार केलेला दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेस फूटणार नाहीच!
चार राज्यांच्या निकालानंतर काँग्रेस फुटणार असे दावे केले जात आहेत. मात्र, या दाव्यांमध्ये तत्थ्य नाही. . या चर्चेला आता पूर्णविराम देण्याची गरज आहे, असेही पटोले म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..