नगर परिषदेने कोरोना विरुद्धच्या लढाईत कार्य करणाऱ्यांचा सर्व कर्मचारी आणि सफाई कामगार यांचा 50 लाखाचा विमा काढावा : नगरसेवक निशांत बयास
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद शहरात एकही करोना ग्रस्त रुग्ण अद्याप आढळला नाही. आपले शहर कोरोना मुक्त ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले फ्रन्टलाइन वारियर्स म्हणजे आपल्या नगर परिषदे मधील सर्व कर्मचारी तथा सफाई कामगार होत.नगर परिषद मधील कर्मचारी तथा सफाई कामगार मागील अंदाजे 50 दिवसापासून या लढाईत दिवस-रात्र कार्यरत आहे. आपल्या कुटुंबाची पर्वा न करता ते कार्य पूर्ण कुशलतेने स्वतःला झोकून देऊन करत आहेत त्यामुळे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही अर्थातच नगरपरिषदेवर येते.
पोलीस विभागाने कोरोना लढाईत कार्य करणारे आपल्या कर्मचाऱ्यांचा 50 लाखाचा विमा याआधी काढला आहे त्यामुळे आपणही आपल्या नगर परिषदेमार्फत या सर्व कोव्हीड योद्धा चा 50 लाखाचा विमा काढावा तसेच जर भविष्यात यापैकी कोणी कोरोना ग्रस्त झाला तर त्यांचा संपूर्ण खर्च हा नगर परिषदेमार्फत करण्यात यावा असे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना नगरसेवक निशांत बयास आणि पंचशिला कांबळे महिला व बालकल्याण सभापती नगर परिषद पुसद यांनी दिले आहे.