‘महाराष्ट्र त्यांनी पेटवला आता आम्ही पाहायलाही..’; भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र या मागणीला ओबीसी समाजाकडून विरोध होत आहे.
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील याचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मी बोलायला गेलो तर ते म्हणतात तुम्हाला महाराष्ट्र पेटवायचा आहे का? पेटवला त्यांनी आता मी बघायलाही जायचं नाही का? बघायला गेलो तर लोकांच्या पुढे बोलयचंही नाही का? मी एवढी दहशत कधी बघितली नव्हती, असा हल्लाबोल भुजबळ यांनी केला आहे.
दरम्यान दुसरीकडे आज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जालना शहरातील पांजरा पोळ मैदानावर दुपारी 2 वाजता सभा होणार आहे. 70 ते 80 एकरावर या सभेचं नियोजन करण्यात आले असून, सभेपूर्वी मोटरसायकल रॅली देखील काढण्यात येणार आहे. या रॅली दरम्यान विविध समाज बांधवांकडून मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत होणार आहे.