बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार देणार का…? अजितदादा जाहीरपणे स्पष्टच बोलले…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. देशासह राज्यातील प्रमुख पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यातील सध्याची स्थिती पाहाता, महायुती आणि महाविकास आघाडीतील कोणत्या घटक पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
यासोबतच आता राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानं अजित पवार गट बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार देणार का? याबाबत देखील मोठी उत्सुकता आहे.
अजित पवार गटाचं कर्जतमध्ये शिबीर सुरू आहे. या शिबीरात बोलताना अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. मार्चमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ताकतीनं कामाला लागा अशा सूचना अजित पवार यांनी या शिबीरातून आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘जागा वाटपाबाबत लकरच चर्चा हेईल. सातारा, शिरूर, रायगड, बारामती या जागा आपन लढवू, बाकीच्या जागांबाबत एकनाथ शिंदे, फडणवीसांसोबत चर्चा होईल. ‘ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यानं ते सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार देणार का हे पाहाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार यांनी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. केसेस आहेत म्हणून आम्ही भाजपसोबत गेल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आरोप सिद्ध व्हावे लागतात असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.