गावाकडून उडत येवू काय ? म्हणणारा कर्मचारी अखेर निलंबित
वरिष्ठांना उर्मट उत्तर देणे भोवले ; शोकॉज चे उत्तर झाले होते सोशल मीडियावर व्हायरल.
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख ९६३७८८६७७७
महागाव :
कोरोना महामारित शासकीय कार्यालयात दांडी मारणाऱ्या महागाव तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनला शो कॉज ला वरिष्ठांना हास्यास्पद आणि धमकीवजा
उत्तर सादर करणे महागात पडले असून अखेर त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.अरुणकुमार खैरे असे निलंबित अव्वल कारकूनाचे नाव आहे.२६ मार्च रोजी कार्यालयात गैरहजर असल्याचे आढळून आल्याने तहसीलदार निलेश मडके यांनी सदर अव्वल कारकुनाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
त्यामुळे त्यांच्या सह कर्तव्यावर गैरहजर आढळून येणाऱ्या तलाठी व कर्मचारी यानाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.त्या नोटीस ला उत्तर (खुलासा) देताना खैरे यांनी आदरपूर्वक उत्तर देण्याऐवजी उर्मट भाषेत आणि धमकीवजा पत्र दिल्याने तहसील प्रशासनात खळबळ उडाली होती. सदर लेखी उत्तर कार्यालय हजर राहून देणे अपेक्षित असताना कार्यालयाच्या व्हॉटसअप ग्रुप दिले.त्या पत्रात कोरोना मुळे सर्वत्र सुरू असलेले लॉक डाऊन कारणास्तव खाजगी वाहने बंद आहेत.त्यामुळे मी गावाकडे अडकून आहे. आता कार्यालय उडत उडत येवू का काय ? मी किवा तुम्ही मेले तरी तहसील कार्यालय बंद पडणार नाही. असे उर्मट भाषेचा वापर करून पत्रात धमकी वजा पत्र तहसीलदार यांना दिलेल्या खुलाश्यात नमूद केले होते.त्यामुळे अपमान आणि हास्यास्पद पत्राची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. सदर पत्र सर्वच विभागातील कार्यालयाच्या व्हॉटसअप ग्रुपवर व्हायरल झाले होते.विशेष म्हणजे कारणे दाखवा नोटीस ला उत्तराच्या प्रती उपविभागीय अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांना पाठवल्या होत्या. पत्राची खात्री करून अव्वल कारकून यांची बाजू ऐकून कार्यवाही करण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले होते. त्यामुळे नियमभंग व दोषी आढळून आलेल्या अव्वल कारकून अरुणकुमार खैरे याला अखेर निलंबित करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले आहे. पुढील चौकशीअंती कठोर
कार्यवाही करण्यात होणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. खैरे सह अजुन किती कामचुकार कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.