कृषी क्षेत्राला तात्काळ १ लाख कोटींचं पॅकेज- अर्थमंत्री सीतारामन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच २० लाख कोटी रुपयांचे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमधून कृषी क्षेत्राशी संबंधित घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी, शुक्रवारी केली. कृषी क्षेत्राशी संबंधित साधनसुविधांसाठी केंद्र सरकार तात्काळ १ लाख कोटी रुपयांची तरतूद करत असल्याचा निर्णय सीतारामन यांनी जाहीर केला.
१ लाख कोटींचा निधी कोल्ड चेन्स, पीक काढणी पश्च्यात व्यवस्थापन साधनसुविधांसाठी शेतकरी उत्पादक संघटना, प्राथमिक कृषी सहकारी सोसायट्या यांच्यासाठी उपलब्ध केला जात आहे. भारत सर्वात मोठा दूध, ज्यूट उत्पादक आणि डाळींचे उत्पादन करणारा देश आहे.ऊस, कापूस, शेंगदाणे, फळे, भाज्या, मत्स्यउत्पादनात देशाचा जगात दुसरा क्रमांक लागतो. तर तिसऱ्या क्रमांकाचा तृणधान्य उत्पादक देश आहे, भारतीय शेतकऱ्यानं मोठे परिश्रम केले आहेत आणि आपल्याला सर्वाधिक उत्पादन मिळवून देईल याची काळजी घेतली आहे, असे सीतारामन यांनी म्हटले.
लॉकडाऊन दरम्यान शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची आठवण अर्थमंत्री सीतारामन यांनी करून दिली. ७४,३०० कोटी रुपयांची लॉकडाऊन दरम्यान किमान आधारभूत किंमतीत खरेदी केली. १८,७०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले. ६४०० कोटी रुपये पीएम पीकविमा योजनेअंतर्गत दिल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
लॉकडाऊन दरम्यान ग्राहक दूध खरेदी करु शकले नाहीत, त्यामुळे दूध रस्त्यावर ओतले जात होते, या काळात सहकारी संस्थांनी दर दिवशी ५६० लाख लिटर्स दुधाची खरेदी केली. १११ लाख अतिरिक्त दुधाची खरेदी करण्यात आली. याचे ४,१०० कोटी रुपये शेतकऱ्यांने दिले, असेही त्या म्हणाल्या.
केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या…
👉 लॉकडाऊन दरम्यान ग्राहक दूध खरेदी करु शकले नाहीत, त्यामुळे दूध रस्त्यावर ओतले जात होते, या काळात सहकारी संस्थांनी दर दिवशी ५६० लाख लिटर्स दुधाची खरेदी केली. १११ लाख अतिरिक्त दुधाची खरेदी करण्यात आली. याचे ४,१०० कोटी रुपये शेतकऱ्यांने दिले
👉हे आपल्या शेतकऱ्यांचे श्रेय आहे, त्यांनी रब्बी पिकांची काढणी जवळपास पूर्ण केली आहे. अनेक राज्यांनी लाॅकडाऊन असूनही खरेदी पूर्ण केली आहे.
– 👉शेतकऱ्यांच्या खात्यात १८,७०० कोटी रुपये हस्तांतरित केले
– 👉पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत ६,४०० कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरीत
– 👉आर्थिक मदतीच्या तिसऱ्या टप्प्यातील उपाययोजनांची घोषणा. यात कृषी क्षेत्र आणि संबंधित व्यवहारांवर भर, मत्स्यव्यवसायाचाही त्यात समावेश.