माधुरी दीक्षित वाढदिवस विशेष : ….तर टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूसोबत झाले असते माधुरीचे लग्न
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नव्वदच्या दशकामध्ये लाखो प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन असणारी अभिनेत्री म्हणजे आपली मराठमोळी माधुरी दीक्षित. माधुरी हिचा आज 53 वा वाढदिवस. 15 मे 1967 ही तिची जन्मतारीख. आज माधुरी ड़ॉ. नेने यांच्यासोबत सुखी संसारात गुंतली असली तरी एके काळी टीम इंडियाच्या खेळाडूवर तिचा जीव जडला होता.या खेळाडूचे नाव आहे अजय जडेजा.
बॉलिवूडमध्येही माधुरीचे चाहते आहेत. संजय दत्त आणि अनिल कपूर सारख्या अभिनेत्यांसोबतही तिचे नाव जोडले गेले. परंतु माधुरीचे ह्रदय मात्र क्रिकेटच्या मैदानावर षटकार खेचणाऱ्या जडेजाने जिंकले होते. त्या काळी माधुरी आणि जडेजाच्या लव्ह स्टोरीचे किस्से सर्वत्र ऐकले जात होते.या दोघांची पहिली भेट एका मॅकझीनच्या फोटोशूट दरम्यान झाली होती. पहिल्या भेटीपासूनच दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशी चर्चा सुरू झाली होती. त्याकाळी हँडसम अजय जडेजाचेही लाखो दिवाने होते आणि मुली त्याच्यावर फिदा असायच्या. माधुरीसोबत नाव जोडले गेल्यानंतर तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशीही चर्चा सुरू झाली. काही चित्रपटांमध्ये त्याने कामही केले.माधुरी आणि जडेजा लग्न करणार अशाची चर्चा सुरू झाल्या, परंतु याच दरम्यान जडेजाचा फॉर्म हरवला आणि तो मैदानावर प्रभावी कामगिरी करू शकला नाही. माधुरीमुळे जडेजाचे क्रिकेटवरून लक्ष उडाल्याची कुरबूर घरात सुरू झाली.जडेजा हा एका रॉयल कुटुंबातील होता तर माधुरी तेव्हा मध्यमवर्गीय कुटुंबात मोडत होती आणि याचमुळे माधुरीला जडेजा कुटुंबाचा नकार होता. त्यामुळे जडेजाने माधुरीपासून लांब राहणे पसंद केले. यानंतर माधुरीने डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला तर जडेजाने जया जेटली यांची मुलगी आदिती जेटली हिच्याशी विवाह केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..