जगासाठी धोक्याची घंटा, ‘अमेझॉन’च्या जंगलातून कोरोनापेक्षा धोकादायक व्हायरस पसरण्याची शक्यता
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोरोना विषाणूचे थैमान अद्याप सुरूच असताना ब्राझीलमधील जगातील सर्वात मोठ्या ‘अमेझॉन’च्या जंगलातून मोठी बातमी आली आहे. ‘अमेझॉन’च्या जंगलातून कोरोनापेक्षा जीवघेणा व्हायरस पसरू शकतो अशी चेतावणी ब्राझीलचे पर्यावरणप्रेमी डेव्हिड लापोला यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरू असताना अमेझॉनच्या जंगलात प्रचंड वृक्षतोड होतयामुळे या जंगलातून नवीन व्हायरस निर्माण होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
जंगलातील वृक्षतोड आणि शहरीकरण यामुळे प्राण्यांकडून व्हायरस माणसामध्ये पसरण्याची शक्यता आहे. अमेझॉन जंगल व्हायरसची खाण आहे असे 38 वर्षीय लापोला यांनी ‘एएफपी’सोबत बोलताना सांगितले. जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे क्षेत्र वेगाने नष्ट केले जात आहे. राष्ट्रपती जायर बोल्सनरो यांच्या कार्यकाळात ब्राझीलमधील अमेझॉनच्या जंगलातील वृक्षतोड 85 टक्क्यांनी वाढली. या वर्षी सुरुवातीच्या 4 महिन्यातच विक्रमी 1202 चौरस वर्ग किलोमीटरमधील झाडं तोडण्यात आली. ही मानव जातीसाठी आणि आपल्या ग्रहासाठी वाईट बातमी असल्याचे लापोला म्हणाले.लापोला पुढे म्हणाले की, अशीच परिस्थिती राहिली तर अमेझॉनच्या जंगलातील दुर्मिळ प्राण्यांपासून नवीन विषाणू मानवात प्रवेश करण्याचा धोका आहे. एचआयव्ही, इबोला आणि डेंग्यूसारखे जीवघेणे आजारही असेच निर्माण झाल्याचे ते म्हणाले. दक्षिण आशिया आणि आफ्रिकन देश आधीच याला बळी पडले आहेत. त्यात कोरोनाचे संकट आणि आता अमेझॉनच्या जंगलातून नवीन व्हायरसचा उदय होऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. असे झाल्यास कोरोनापेक्षा मोठ्या संकटाचा जगाला सामना करावा लागू शकतो, अशी चेतावणी त्यांनी दिली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..