कृषिमंत्री मुंडेंच्या जिल्ह्यात नवा घोटाळा, कारखान्याच्या जागेवर भरला पीक विमा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- देशात पीकविमा पॅटर्नसाठी गाजत असणाऱ्या कृषिमंत्री धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यात बोगस पीक विम्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. आतापर्यंत 30000 एकर शासकीय जमिनीवर पीक विमा भरल्याचे समोर आलं होतं.
मात्र, आता चक्क सहकारी साखर कारखान्याच्या जागेवरच पीक विमा भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
माजलगाव शहराजवळ छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे. याच सहकारी साखर कारखान्याच्या 99 एकर जमिनीवर चक्क उस्मानाबादच्या कळंब तालुक्यात असणाऱ्या आथर्डी गावच्या प्रतापसिंह बाबासाहेब चौधरी नामक व्यक्तीने 12 रुपयांमध्ये पीकविमा भरलाय. ज्याची मिळणारी रक्कम ही 18 लाख 23 हजार 37 रुपये आहे. तर याच बोगस पीकविमा आणि फसवणूक प्रकरणी, कारखान्याचे संचालक/चेअरमन मोहन जगताप यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. विशेष म्हणजे लिखित तक्रार करत, मोहन जगताप यांनी ज्या व्यक्तीने पिक विमा भरलाय आणि ज्या सीएससी सेंटर चालकाने हा पिक विमा भरून घेतलाय, या दोघांच्या नावासह आणि मोबाईल नंबरसह ही तक्रार केली आहे.
दोषींवर कारवाई होईल :- धनंजय मुंडे
दरम्यान संबंधित पीक विमा कंपनीतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगणमताने ही बोगस पीक विमा भरणारी साखळी आहे. ज्या कारखान्याच्या जमिनीवर पीक विमा भरला, त्यामध्ये बोगस बाँडचा देखील वापर करण्यात आलाय. त्यामुळे या सर्व दोषी आरोपींवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोहन जगताप यांनी केली आहे. ज्यांनी कुणी बोगस पीक विमा भरला आहे, त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असं राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान 30 हजार एकर जमिनीवर बोगस पीक विमा भरूनही अद्याप एकही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र आता कारखान्याच्या जमिनीवरच बोगस पीक विमा भरणारे नवे रॅकेट समोर आल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यावर काय कारवाई करणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….