महाराष्ट्रात मराठीच..! घाटकोपरमधील उद्यानाला लावलेला गुजराती बोर्ड ठाकरे गटाने तोडला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईतील घाटकोपरमध्ये एका उद्यानाला लावण्यात आलेला गुजराती बोर्ड तोडून टाकण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे गुजराती बोर्ड तोडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हे गुजरातीमध्ये असलेलं नाव मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत होतं.
या अगोदर मनसेनं देखील हे नाव काढण्याची मागणी केली होती. मात्र मध्यरात्री शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अचानक या नावाची तोडफोड केली.
‘मारु घाटकोपर’ असं लिहलेल्या या बोर्डची सोशल मीडियावर मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. तसेच यावरून वादही सुरू होता. या मराठी-गुजराती भाषेच्या वादात हा बोर्ड तात्काळ हटवला जावा अशी मागणी महापालिकेकडे केली जात होती. आता ठाकरे यांच्या शिवसेनेने हा बोर्ड काढून टाकला असून या जागेवर जय महाराष्ट्र, माझं घाटकोपर, उद्धव बाळासाहेब ठाकरे असा मजकूर असलेला बोर्ड लावण्यात आला.
एका रात्रीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारू घाटकोपर असलेली ही अक्षरं उध्वस्त केलीत आणि तिथे माझे घाटकोपर असा मराठी फलक लावला आहे. मराठी भाषिक महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत जर अशा पद्धतीने मराठीची गळचेपी होत असेल तर प्रश्न हा उपस्थित होतो की या प्रशासकीय अधिकाऱ्यांना राजभाषा मराठी बद्दल आपुलकी उरली आहे की नाही? एकीकडे मुंबईतून मराठी माणसाचा टक्का कमी होत असताना असे प्रकार घडणं दुर्दैव! अशी भावना शिवसेना उबाठा गटानं व्यक्त केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….