भाजप विरोधात ‘इंडिया आघाडी’चा आज मुंबईत मोर्चा..! वडेट्टीवारांच्या आरोपानंतर ठाकरे गट नाराज..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर देशातील राजकीय पक्षांकडून हलचालींनी वेग आला आहे. विरोधकांची इंडिया आघाडीकडून पीएम मोदी आणि भाजपविरोधात मोर्चेबांधणी केली जात आहे. यादम्यान आज (२ ऑक्टोबर) इंडिया आघाडीकडून भाजपच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबईतील या मोर्चामध्ये ठाकरे गट सहभागी होणार की नाही याबाबत मात्र अस्पष्टता आहे.
काँग्रेस-ठाकरे गटात बिनसलं?
दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी दांडी मारली होती. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याबाबत एक मोठं विधान केलं होतं.
वडेट्टीवार यांनी अंबादास दानवे मराठा आहेत मात्र त्यांच्याकडे ओबीसी जात प्रमाणपत्र असल्याचे वडेट्टीवार म्हणाले होते. त्यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही पक्षात विसंवाद असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. तसेच विजय वडेट्टीवार यांच्या आरोपाने ठाकरे गट नाराज असल्याच्या चर्चा देखील आहेत. त्यामुळे आजच्या मोर्चात शिवसेना सहभागी होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमकं काय झालं?
काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी उद्धव ठाकरे गटातील नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे मराठा असून देखील त्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचे आरोप पत्रकार परिषदेत केला होता. यानंतर दानवे यांनी स्पष्टीकरण देत त्यांच्याकडे ओबीसी जात प्रमाणपत्र नसल्याचे सांगितले. तसेच त्यांनी वडेट्टीवारांना पुरावा देण्याची मागणी करत हा आरोप फेटाळून लावला आहे.
मागील काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून आंदोलने होत आहेत. तर ओबीसी समाज मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा विरोध करत आहे. यादरम्यान वडेट्टीवार यांनी आरोप केला आहे की मराठवाड्यातील जवळपास २८ लाख लोकांनी पैसे देऊन ओबीसी जात प्रमाणपत्र मिळवलं आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….