तर हिवाळी अधिवेशना अगोदर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाऊ शकते..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या अपात्र आमदारांच्या याचिकेवर नोव्हेंबरपर्यंत निर्णय अपेक्षित आहे. विधानसभा अध्यक्षांनी शेड्यूल्ड १० नुसार कारवाई केल्यास हिवाळी अधिवेशना अगोदर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाऊ शकते, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कल्याण येथे केला.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात ३० सप्टेंबरपासून शरद संपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्ता आणि जनतेपर्यंत शरद पवारांचे विचार पोहोचवण्याचे काम होणार असल्याची माहिती प्रवक्ते तपासे यांनी कल्याण येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच कल्याण लोकसभा मतदारसंघात जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. महायुतीचा कोणीही उमेदवार असला तरी या दोन्हीही लोकसभा मतदारसंघांमध्ये ‘इंडिया आघाडी’ला मोठा प्रतिसाद सर्वसामान्य जनतेमधून दिसत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ‘इंडिया आघाडी’चा उमेदवार निवडून येईल, यात कुठलेही दुमत नसल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
देशातील आणि राज्यातील सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. ४० टक्के निर्यात कर लावून केंद्र सरकार शेतकऱ्यांचा कांदा सडवण्याचे काम करत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मंत्रालयात सर्वसामान्यांपेक्षा कार्यकर्त्यांचा मंत्र्यांसमोर मोठ्या प्रमाणात गराडा असतो, असा टोलाही यावेळी तपासे यांनी राज्य सरकारला लगावला.
रोजगार निर्मितीत सरकार अपयशी
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. शिंदे-फडणवीस सरकार रोजगार निर्मिती करण्यात आणि उद्योगधंदे राज्यात आणण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकण्यात येत नसल्याने युवा शेतकऱ्यांवर मंत्रालयात येऊन आंदोलन करण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य लोकांचे आवाज आणि प्रश्न कोणीही सोडवत नसल्याने सर्वसामान्य जनतेला आपले प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात येऊन आंदोलन करावे लागते, ही बाब खेदजनक आहे. याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी यावेळी केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..