राजकीय घडामोडींना वेग…! रात्री मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची ‘वर्षा’वर दोन तास बैठक, कशावर झाली चर्चा..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. अशातच काल(शनिवारी) रात्री 10 वाजण्याच्या आसपास राजकीय घडामोडींना वेग आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले. या तीनही नेत्यांमध्ये ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक दोन तास चालली आहे. तर या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण तसेच कांदा प्रश्नावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान गणेशोत्सवामध्ये अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी गेले नव्हते. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. त्यानंतर आता अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी बैठकीसाठी दाखल झाले.
या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न या महत्त्वांच्या गोष्टीवर चर्चा करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही गेल्या वर्षभरापासून रखडलेला आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं लक्ष आहे. दरम्यान या बैठकीत यासंदर्भातही चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..