ओबीसी महासंघाचे २१ दिवसानंतर उपोषण मागे, सरकार मागण्या पूर्ण करणार असल्याचे फडणवीसांचे आश्वासन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंद्रपूर :- चंद्रपूरात २१ दिवसांपासून सुरु असलेले ओबीसी महासंघाचे उपोषण मागे घेण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उपोषणस्थळी गेले होते. त्यांच्या हस्ते पाणी पिऊन रविंद्र टोंगे यांनी उपोषण मागे घेतले.
काल ओबीसी समाज आणि सरकारची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेण्यात आली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा-ओबीसी वाद निर्माण होणार नाही, याची सरकार काळजी घेणार आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. पण ओबीसींवर आघात होणार नाही, याची सरकार काळजी घेईल.
काल झालेली बैठक रेकॉर्ड झाली आही. राष्ट्रीय ओबीस महासंघाला त्याची प्रत देखील आम्ही दिली आहे. आश्वासन दिलं आणि पूर्ण होणार नाही असं अजिबात होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मी मुख्यमंत्री असताना ओबीसी मंत्रालय वेगळं केल. नरेंद्र मोदी यांनी देखील ओबीसी हिताचे अनेक निर्णय घेतले. ओबीसींच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे फडणवीस म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..