चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘ढाब्यावर न्या’ विधानावर सुप्रिया सुळेंचा अप्रत्यक्ष टोला ; ट्वीट केली ‘ती’ कविता…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलेल्या एका विधानावरून सध्या मोठी चर्चा सुरू झाली आहे. बावनकुळेंच्या या विधानावरून भाजपा पदाधिकारी व नेतेमंडळी सारवासारव करताना दिसत असून दुसरीकडे विरोधकांनी त्यावरून भाजपाला घेरायला सुरुवात केली आहे.
आपल्याविरोधात बातम्या छापून येऊ नयेत यासाठी पत्रकारांना ढाब्यान घेऊन जा, असं बावनकुळे या बैठकीत म्हणत असल्याचं व्हायरल क्लिपमध्ये ऐकू येत असून त्यावरून राजकारण रंगलं आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकीय विश्लेषण हेरंब कुलकर्णी यांची एक कविता एक्सवर (ट्विटर) पोस्ट केली आहे.
सुप्रिया सुळेंचा बावनकुळेंना टोला!
सुप्रिया सुळे यांनी या पोस्टमध्ये कुलकर्णींच्या कवितेशिवाय इतर कोणताही संदर्भ दिला नसला, तरी त्यांची ही पोस्ट म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानावर थेट टोला असल्याचं बोललं जात आहे. बावनकुळेंच्या त्या विधानाच्या अनुषंगानेच या कवितेतील बोल आहेत.
काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी २४ ऑगस्ट रोजी अहमदनगरच्या सावेडीमध्ये भाजपा पदाधिकारी व बूथ कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना माध्यम प्रतिनिधींशी विशिष्ट पद्धतीने वागण्याचा सल्ला दिला. ‘पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात (भाजपा) बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा’, असं त्यांनी म्हटल्याचं व्हायरल क्लिपमध्ये ऐकू येत आहे.
सुप्रिया सुळेंनी पोस्ट केलेल्या कवितेत काय?
सुप्रिया सुळेंनी पोस्ट केलेल्या हेरंब कुलकर्णींच्या कवितेमध्ये याच मुद्द्याला हात घालण्यात आला आहे. ‘चला, आपण धाब्यावर जाऊ.. मी त्यांना म्हणालो, पाण्यात तरंगणारे तुमचे नागपूर शहर आपण पाहू. तर ते म्हणाले नको नको..त्यापेक्षा आपण धाब्यावरच जाऊ’, असं या कवितेचं पहिलं कडवं आहे.

‘धाब्यावर जाताच मी म्हणालो..दारू दुकाने वाढवण्याची. निषेधार्ह बातमी दाखवू का? ते म्हणाले हली ती चव आत्ता तुम्हाला चाखवू का? मी विचारले सहजपणे. समृद्धी महामार्गावर अपघात का बरे वाढले? प्रश्न दाबायला त्यांनी मग पाकीटच बाहेर काढले’, अशा शब्दरचनेतून कवितेमधून बावनकुळेंच्या त्या विधानावर खोचक टीका करण्यात आली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..