‘कल्याण’च्या बदल्यात ‘ठाणे’..? लोकसभेसाठी भाजपचं शिंदे गटाशी साटंलोटं, चाणक्यनीती यशस्वी ठरणार का..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण मतदार संघातील वाद आता मिटला आहे. कारण कल्याणची जागा शिंदे गटाला तर ठाण्याची जागा भाजपला देण्याचं ठरलं आहे. सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
भाजपचा शिंदे गटासोबत साटंलोट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर ठाण्यात स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांमधील वाद विरोपाला गेल्याचं चित्र काही दिवसांपूर्वी दिसलं होतं.
शिंदे गटाचे नेते दिपक केसरकर म्हणाले, भाजप आणि सेनेची युती मजबूत आहे. आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही. स्थानिक पातळीवर वाद असतील तर पक्षांचे नेते वाद मिटवण्यासाठी सक्षम आहेत. भाजप आणि शिवसेनेने खालील पातळीवर एकत्र काम करावं, असा वरिष्ठांचा स्पष्ट आदेश आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाने लढवावी अन् ठाणे भाजपला द्यावी, असा प्रस्ताव मान्य झाल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र या प्रस्तावामुळे ठाण्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.
ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातून शिवसेना वाढवली. आनंद दिघे हे देखील ठाण्यातून शिवसेना चालवायचे त्यामुळे पुत्र प्रेमासाठी एकनाथ शिंदे ‘स्वाभिमानी’ ठाणे भाजपला देणार का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राजन विचारेंना धक्का?-
ठाणे लोकसभेवर सध्या ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. राजन विचारे हे ठाकरे गटाचे खासदार आहेत. त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली नाही. आनंद दिघे यांचे राजन विचारे एक हात होते तर एकनाथ शिंदे दुसरा हात. त्यामुळे ठाणे भाजपला दिले नाही तर लोकसभेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध ठाकरे गट, अशी लढाई होऊ शकते. त्यामुळे शिंदे गट कल्याण आपल्याकडे ठेवत ठाणे भाजपला देण्यासाठी तयार होईल, असे राजकीय जाणकरांचे मत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..