सोबत येण्यासाठी अजितदादांकडून एका नेत्यामार्फत विचारणा ; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या काही दिवसापासून भाजप नेते गिरीष महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांना घट्ट पकडून रहावे भाजपकडे येण्यासाठी हातपाय जोडू नये, अशी टीका गिरीष महाजन यांनी खडसे यांच्यावर केली.
या टीकेला आज आमदार एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
एकनाथ खडसे म्हणाले, मला सत्तेत जायचे असते तर कधीच गेलो असतो. गिरीष महाजन यांना कधीच पुढे आणलं नसतं. अनेकदा मला अजितदादांनी अमोल मिटकरींतर्फे विचारणा केली होती. तुम्ही आमच्यासोबत या असं त्यांनी म्हटले होते, पण आम्ही शरद पवार यांच्याकडे एकवेळ आलेलो आहे. मी शरद पवार यांचा पक्का शिलेदार आहे. मला भाजपमध्येही येण्यासाठी आग्रह करतात. यात बावनकुळेंपासून ते विनोद तावडेंपर्यंत सगळ्यांनी आग्रह केली तरीही मी भाजपमध्ये गेलो नाही, मग अजित पवारांकडे मी कसा जाईल, असा सवालही खडसे यांनी केला.
गेल्या काही दिवसापासून भाजप नेते गिरीष महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
शरद पवारांना सोडू नका: गिरीष महाजन
गिरीष महाजन म्हणाले, “एकनाथ खडसे यांनी आमची काळजी करू नये, राष्ट्रवादीमध्ये राहिलेले अनेकजण आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे खडसेंनी आता शरद पवारांना घट्ट पकडून राहावं. इकडे परत येण्यासाठी पुन्हा हातपाय जोडू नका”, असा टोलाही महाजन यांनी खडसेंना लगावला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..