भाजपला धक्क्यावर धक्के…! AIADMK ने युती तोडली, कार्यकर्त्यांनी फटाके फोडले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चेन्नई :- दक्षिण भारतात आपले स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. तामिळनाडूमधील मित्रपक्ष, एनडीए आघाडीतील घटक पक्ष AIADMK ने भाजपसोबत युती तोडली असल्याची घोषणा केली आहे.
आज झालेल्या बैठकीत अण्णाद्रमुकने अधिकृतपणे एनडीएतून बाहेर पडण्याच्या आणि भाजपसोबतची आघाडी मोडीत काढत असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
AIADMK नेत्यांच्या बैठकीनंतर पक्षाचे उप समन्वयक के पी मुनुसामी यांनी म्हटले की, आजपासून अण्णाद्रमुकने भाजप आणि एनडीए सोबतचे सगळे संबंध तोडत आहोत. भाजपचे राज्य नेतृत्व मागील वर्षभरापासून आमचे पक्षाचे महासचिव ईपीएस पलानीस्वामी, इतर नेत्यांसह कार्यकर्त्यांवरदेखील अनावश्यक टीका-टिप्पणी करत आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत भाजपसोबत युती तोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले.
अण्णाद्रमुकने युती तोडत असल्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
तिसऱ्या आघाडीचा डाव मांडला जाणार ?
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अण्णाद्रमुकने म्हटले की, आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत अण्णाद्रमुक एका वेगळ्या आघाडीचे नेतृत्व करणार आहे. सध्या भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी आहे. इंडिया आघाडीत 28 पक्ष आहेत. त्यात डाव्यांसह तृणमूल काँग्रेस, आप सारख्या पक्षांचा समावेश आहे. तर, एनडीएमध्ये विविध प्रादेशिक आणि लहान पक्षांसह 30 हून अधिक पक्ष आहेत.
देशातील अनेक पक्ष हे एनडीए अथवा इंडिया आघाडीचे घटक नाहीत. यामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर यांचा भारत राष्ट्र समिती, ओवैसी यांचा एमआयएम, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेससह अनेक राजकीय पक्ष आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..