वेगवेगळ्या सुनावणीस ठाकरे गटाचा विरोध तर, शिंदे गटाकडून नियमांचं उल्लंघन ; आजच्या सुनावणीत काय झालं…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्रतेवर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आज (25 सप्टेंबर) दुसऱ्यादा सुनावणी होत आहे. दोन्ही गटांच्या युक्तीवादानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजचा निर्णय राखून ठेवला आहे.
यासंदर्भात पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे. शिंदे गटाकडून अनिल साखरे आणि ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी आज युक्तीवाद केला.
आजची सुनावणी पार पडल्यानंतर संजय शिरसाट म्हणाले की, वेळापत्रकानुसार पुढील सुनावणी घेतली जाणार आहे. वेगवेगळ्या सुनावणी करण्यास ठाकरे गटाचा विरोध होता, पण विधानसभा अध्यक्षांनी याला नकार दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाचे म्हणणे ऐकूण घेतले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच आमदार अपात्रतेची सुनावणी होणार आहे. पुढे सुनावणी कशी घ्यायची यासंदर्भात आज विचार झाला असून पुढील दोन ते तीन दिवसात विधानसभा अध्यक्ष याप्रकरणात ऑर्डर काढतील. त्यानंतर 13 तारखेला एकत्र सुनावणी घ्यायची की नाही ते ठरवलं जाईल, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.
दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपला युक्तिवाद सादर केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आजचा निर्णय राखून ठेवला आहे. तसेच लाईव्ह सुनावणी घेण्यावर अध्यक्षांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. परंतु दोन्ही गटांना आणखी माहिती द्यायची असल्यामुळे पुढील सुनावणी कशी घ्यायची यासाठी विधानसभा अध्यक्ष वेळापत्रक जाहीर करतील. प्रत्येक प्रकरणाची सुनावणी व्हायला हवी, कोणावर अन्याय होऊ नये. यासाठी वेळ लागला तरी चालेल, अशी अध्यक्षांची भूमिका आहे, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.
शिंदे गटाकडून नियमांचं उल्लंघन
आमदार अपात्रतेच्या सुनावणीनंतर बोलताना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई म्हणाले की, शिंदे गट मुंबईहून गुवाहाटीला गेले, सुरतला गेले तिथे त्यांनी काही ठराव केले. आम्ही त्या गोष्टी नाकारत नाही, पण त्यांनी जे ठराव केले ते 10 व्या सूचीनुसार नियमांचं उल्लंघन आहे. आजही उद्धव ठाकरे हेच पक्षाचे अध्यक्ष असतानाही त्यांनी ठराव पास केला. ते कृत्य 10 व्या सूचीच्या परिशिष्ट 10 अ मध्ये बसतं. सभागृहात शिंदे गटाला सुनील प्रभूंचा व्हिप होता. पण तिथेसुद्धा त्यांच्याकडून 10 व्या सूचीच्या परिशिष्ट अ चं उल्लंघन झालं. त्यामुळे अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे पुरावे गोळा करण्याची गरजच नाही. आम्ही हे मुद्दे सातत्याने अध्यक्षांना लक्षात आणून देत आहोत. 29 आणि 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटले. 30 जूनला त्यांचा शपथविधी झाला. या सगळ्या गोष्टींना पुराव्याची गरज नाही, कारण ते सगळं झालंच आहे. त्यामुळे अपात्रतेची कारवाई 2/1 अ आणि ब नुसार हे उल्लंघनच आहे. हे सगळे मुद्दे आम्ही अध्यक्षांना दिले आहेत. आता पुढची वेळ न दवडता तुम्ही निर्णय घ्या अशी विनंती आम्ही अध्यक्षांना केली आहे, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..