८ वर्षे तुरुंगवास..! आमदाराची सुटका होताच NCP कार्यकर्त्यांचा जल्लोष, बॅनरवर फक्त शरद पवार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सोलापुर :- राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांचं सोलापुरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलंय. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते. तुरुंगातून सुटून आल्यानंतर पहिल्यांदाच ते मोहोळ मतदारसंघात आले.
त्यांना भेटण्यासाठी युवकांनी प्रचंड गर्दी केली होती. ते मोहोळचे माजी आमदार होते.
रमेश कदम यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली. आण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. जामीन मिळाल्यानंतर तब्बल ८ वर्षानंतर त्यांची सुटका झाली आहे. त्यांची सुटका झाल्यानंतरही तुरुंगाबाहेर कार्यकरत्यांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं होतं.
रमेश कदम यांच्यावर काय आरोप होते?
रमेश कदम यांच्यावर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळात कथितरित्या ३१२ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे रमेश कदम तुरुंगात होते. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद रमेश कदम यांच्याकडे होते.
रमेश कदम अध्यक्ष असताना बनावट लाभार्थी दाखवून त्यांनी शेकडो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या भ्रष्टाचाराबाबत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी कदम यांच्यावर आरोप करण्यात आले होते. आण्णाभाऊ साठे महामंडळात २५० कोटींचा भ्रष्टाचार झाला असून ३७०० पानी पुरावे लाचलुचपत विभागाला देण्यात आले होते.
कार्यकर्त्यांकडून स्वागत
रमेश कदम यांच्यास्वागतासाठी कार्यकर्त्यांनी ठाणे मध्यवर्ती कारागृहाबाहेर मोठी गर्दी केली होती. सुटकेनंतर त्यांचे कार्यकर्त्यांकडून ढोल-ताशाच्या गजरात आणि घोषणा देत त्यांचं जंगी स्वागत केलं. मुंबई, ठाणे, सोलापूरमधून अनेक कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी पोहचले होते. रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार होते. त्यांनी 2014 आणि 2019 साली तुरुंगात असताना अपक्ष उमेदवार म्हणून सोलापूर मोहोळ या मतदार संघातून लढवली होती. सुटल्यानंतर ते पहिल्यांदा आपल्या मतदार संघात गेल्यानंतर त्याचं युवकांनी जल्लोषात स्वागत केलं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..