‘तर भाजपला परिणाम भोगावे लागतील”, बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्र्यांना हटविल्यास….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर एका आठवड्याच्या आत सुनावणी सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले असताना त्यावर आता चर्चा सुरू झाली आहे.भाजपने ‘प्लॅन बी’ तयार केल्याचे सांगितले जात आहे.
आता त्यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवार मुख्यमंत्री होणार? या चर्चेवर बच्चू कडू म्हणाले की, ”असे होऊ शकत नाही. तसे झाल्यास मोठ्या प्रमाणावर भाजपला परिणाम भोगावे लागतील. एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचे ५ ते १० टक्के मतदार नाराज होतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपचे काही प्लॅन कामी येणार नाही,”
बच्चू कडू म्हणाले, ” आताच ज्या काही गडबडी झाल्या, त्यामुळे नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. जर एकनाथ शिंदे यांना बाहेर काढले, तर नाराजी वाढणार आहे. नाराजीच्या सुराची टक्केवारी वाढली, तर तुमचे कोणतेही प्लॅन कामी येणार नाहीत, लोक त्यांचे प्लॅन सुरू करतील. मग, लोकच कोणता पक्ष ठेवायचा, हे ठरवतील.”आरक्षणाच्या मागणीवर आमदार बच्चू कडू म्हणाले की, सरकारने एकदा आरक्षणाचा मुद्दा संपवला पाहिजे. आरक्षण विषय हा राजकीय लोकांनी केलेली व्यवस्था आहे. विकासाची व्यवस्था निर्माण होऊ शकली नाही.त्यामुळे विकासावर मते मिळू शकले नाहीत. आता निवडणुकीत आरक्षणावर मते मागितली जाणार. जातीचे मुद्दे घेऊन मते मागणार, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..