महागाव तालुका शिक्षक संघटनांच्या समन्वय समिती कोरोनाच्या लढाईसाठी दिले दोन लाख दहा हजार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
राज्यासह संपूर्ण भारतात कोरोना (कोव्हिड १९)या संसर्गजन्य महामारिने थैमान घातले आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येणारे, डॉक्टर्स,नर्सेस,आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना मास्क, सॅनीटायजर,आणि इतर आरोग्यविषयक साहित्य देण्यासाठी महागाव पं.स.चे गटशिक्षणाधिकारी किशोर रावते यांनी आव्हान केले होते.
त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, गटसंसाधन केंद्रातील कर्मचारी सेवानिवृत्त शिक्षक,तसेच खाजगी शाळेच्या शिक्षक,मुख्याध्यापकांनी स्वयंस्फूर्तीने दोन लाख दहा हजार
(2,10,000 ) निधी सोशल डिस्टन्सींगचा नियम पाळत अॉनलाईन आवाहनाला प्रतिसाद देत जमा केले. असा आगळा वेगळा उपक्रम महागाव तालूक्यातील शिक्षक संघटनांच्या समन्वय समिती ने राबवला आहे.संतोषी माता मेडिकल स्टोअर चे संचालक प्रशांत गावंडे यांच्यामार्फत साहित्याची खरेदी ना नफा ना तोटा या तत्वावर करण्यात आली.
१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालय महागाव येथे पंचायत समितीच्या सभापती अनिता चव्हाण, उपसभापती रामचंद्र तंबाखे यांच्या प्रमुख उपस्थितीत मास्क सॅनीटायजर, हँडग्लोज,व इतर साहित्यांचे तहसीलदार निलेश मडके, तालूका आरोग्य अधिकारी डॉ.जब्बार पठाण, वैद्यकीय अधिकारी
डॉ. बिपिन बाभळे , ठाणेदार दामोधर राठोड,, यांना गटशिक्षणाधिकारी किशोर रावते साहेब यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.त्याप्रसंगी शिक्षक समन्वय समितीचे प्रमुख मार्गदर्शक महेंद्र कावळे ,शिक्षक
रमेश पवार ,पी.डी.राठोड ,बाबूराव खंदारे ,गजानन नांदेडकर ,फार्मासिस्ट प्रशांत गावंडे उपस्थित होते.तसेच पत्रकार गजानन वाघमारे,संजय भगत, नरेंद्र नप्ते व इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन नांदेडकर तर आभार किशोर रावते साहेबांनी मानले. निधी देणाऱ्या सर्व शिक्षक मंडळींचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.