कुख्यात शिनू टोळी विरुध्द मोक्का….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- येथील कुख्यात शिनू शिंदे टोळीविरुद्घ ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्याच्या प्रस्तावाला अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे. मोक्का प्रकरणातील या टोळीविरुद्ध यवतमाळ शहरात चार व नागपूर येथे एक अशा एकूण पाच खुनाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
रोशन उर्फ ज्ञानेश्वर रमेश मस्के (रा. बोरूंदियानगर) याच्यावर चाकूने मानेवर व डोक्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना २६ जून रोजी नागपूर बायपासवर उघडकीस आली होती. या प्रकरणी रमेश श्रावण मस्के (रा. बोरूंदियानगर) यांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
तपासात राहुल उर्फ शिून संजय शिंदे (२३, रा. ताडउमरी, ता. केळापूर), शेख रहिम उर्फ शेरअली मोती सय्यद (२४, रा. इंदिरानगर), नयन सुरेश सौदागर (२८, रा. विठ्ठलवाडी), करण संजय शिंदे (२४, रा. ताडउमरी), वेदांत संतोष मानकर (२०, रा. पाटीपुरा), देवांश अजय शर्मा (२४, रा. माळीपुरा), फारूख खान उर्फ मुक्का बशीर खान (२५, रा. इंदिरानगर), अजिंक्य किन्हेकर (२२, रा. वाघापूर) यांच्यासह अन्य चार विधीसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग निष्पन्न झाला.
टप्प्याटप्प्यात त्यांना अटक करण्यात आली. हा गुन्हा कट रचून व संघटितरित्या केला. त्यामुळे महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अन्वये कलम वाढीची परवानी मिळण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्याकडे यवतमाळ शहर पोलिसांनी तयार केलेला प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पाठविण्यात आला. या प्रस्तावाला गुरुवारी मंजुरी देण्यात आली. या गुन्ह्यात मोक्काचे कलम समाविष्ट करण्यात आले. पुढील तपास पुसदचे सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक आधासिंग सोनोने, अवधूतवाडीचे ठाणेदार ज्ञानोबा देवकते, यवतमाळ शहर ठाणेदार सतीश चवरे, उमरखेड ठाणेदार शंकर पांचाळ, सहायक पोलिस निरीक्षक प्रताप भोस, सपोनि प्रशांत देशमुख, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, बालाजी ठाकरे, राहुल गोरे, उमेश पिसाळकर, राम पोपळघट, विजय पतंगे, दत्ता पवार, रवी नेवारे, अंकुश फेंडर आदींनी केली.
चार सराईतांविरुद्घ ‘एमपीडीए’
जिल्ह्यातील यवतमाळ शहर, अवधूतवाडी व उमरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरीराविरुद्घ, मालमत्तेविरुद्घ गुन्हे करून दशहत पसरविणार्या चार सराईतांविरुद्घ एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांना अकोला येथील कारागृहात स्थानबद्घ करण्यात येणार आहे. यात अवधूतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील अभय उर्फ बित्तम उर्फ विकास दिलीप पातोडे (२२, रा. शिंदेनगर), यवतमाळ शहर हद्दीतील साहिल अली मुज्जफर अली (२३, रा. रामरहिमनगर), उमरखेड हद्दीतील आकाश रविप्रसाद दीक्षित (२२, रा. शिवाजी वार्ड, उमरखेड), विजय गणेश भिमेवार (२१, रा. शिवाजी वार्ड) यांचा समावेश आहे. एमपीडीएकायद्यांतर्गत जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांनी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मंजुरी दिली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..