संपूर्ण नामांतर; आता छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हाही ; नामकरण फलकाचे अनावरण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’,च्या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर विभागाचे आणि धाराशिव जिल्हा नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते झाले.
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर करण्याबाबत विभागीय आयुक्तालयाकडे एकूण सात लाख चार हजार ६५६ आक्षेप आणि सूचना दाखल झाल्या होत्या. त्याबाबत काहीही निर्णय न होताच जिल्हा व महसूल विभागाचे औरंगाबाद हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्यात आले.
न्यायालयात आव्हान देऊ
तीन दशकांपासून जिल्ह्याच्या नामकरणाविरोधात न्यायालयात लढत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मुश्ताक अहमद म्हणाले, सरकारने हरकती, आक्षेपांवर काहीही सुनावणी न घेता गॅझेट काढले. सुनावणीपूर्वीच नामफलकाचे अनावरण करणे हे कायदेशीर नाही.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..