करंजखेड येथे रानडुकराची शिकार ; ७ आरोपी ताब्यात महागाव वनविभागाची कारवाई ;
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :
महागाव :
वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या नियतक्षेत्र करंजखेड येथे रानडुकराची शिकार करणाऱ्या ७ शिकारीना महागाव वनविभागाने ताब्यात घेतले आहे.ही कार्यवाही आज रविवारी सकाळी ६ च्या सुमारास करण्यात आली आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार ,
सकाळ च्या सुमारास
करंजखेड येथील राखीव जंगलात महागाव वनपरिक्षेत्र अधिकारी एच.व्ही उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना राखीव जंगलात वन्यप्राणी रानडुकराची शिकार झाल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळली .त्यादिशेने पेट्रोलिंग करत असताना शिकारी यांचा सुगावा लागताच वनविभागाने सापळा रचला. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दिसताच शिकाऱ्यानी घटनास्थळावरून पळ काढला. कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केली असताना शिकारी वनविभागाने रचलेल्या सापळ्यात शिकारी अडकले.अधिक चौकशी केली असता वन्यप्राणी रान डुकराची शिकार केल्याची कबुली आरोपींनी दिली.आरोपी संतोष दत्ता चव्हाण,साहेबराव अमृत गाजुलावार, किरन आनंदराव देवकर,आनंदराव किसन देवकर, आर्शिवाद उल्हास देवकर,विजय माधव देवकर,दत्ता देवकर सर्व रा.करंजखेड यांना चौकशी कामी वनविभागाने ताब्यात घेतले आहे.त्याच्याकडून शिकारी साठी वापरण्यात आलेल्या तीक्ष्ण हत्यार वनविभागाने जप्त केले .
सर्व आरोपींवर
वन्यजीव अधिनियम १९२७ ची कलम ९ व ३९ तथा भारतीय वन अधिनियम १९२७ ची कलम २६ डी आय अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रानडूकराला पिंपरी येथील नर्सरी परिसरात दफन करण्यात येणार असल्याची माहिती महागाव वनविभाने दिली आहे.
ही कार्यवाही उपविभागीय वनअधिकारी अमोल थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, महागाव वनपरिक्षेत्र अधिकारी एच. व्ही. उबाळे,क्षेत्र सहाय्यक एस.एम.राठोड,क्षेत्र सहाय्यक एम.एस.हक, वनपाल डी, व्ही.गावंडे,वनरक्षक आर.जी. कुबले,डी. एल.केकले, डी. टी.धुळे, एस.एस.डुकरे,यांनी केली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….