सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला जागी करणाऱ्या नवयुवकांचा सत्कार संपन्न..…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- सोशल मीडियाचा योग्य वापर करून लोक जागृती करणाऱ्या कार्तिक कोळपे व टीम तसेच ऋषिकेश जोगदंडे यांचा सार्वजनिक ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते मारोती भस्मे व साकिब शाह यांचेवतीने सत्कार कार्यक्रम संपन्न.

सोशल मीडिया आज आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्याने लोक एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडली जातात. व्हॉट्सऍप, फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि बरेचसे सोशल मीडियाचे विविध प्रकाराच्या माध्यमातून घरबसल्या आपल्या भावना, विचार, समस्या प्रश्न, जगभर पसरविता येतात. लोकं एक दुसऱ्या बरोबर संवाद साधू शकतात व आपली कला, आपल्या भावना जगासमोर व्यक्त करू शकतात. सोशल मीडिया आज आपल्या आयुष्यात खूप मोठी भूमिका बजावत आहे. सोशल मीडिया हे खूप शक्तिशाली माध्यम आहे आणि ते प्रत्येकाला प्रभावित करते. याच बाबीला हेरून पुसद येथील शिवाजी वॉर्डातील ऋषिकेश जोगदंडे यांनी तसेच सुभाष वार्डातील रहिवासी कार्तिक कोळपे यांनी आपल्या नवतरुण मित्रांना एकत्रित करून समाजात भेडसावणारे प्रश्नावर करमणुकीच्या माध्यमातून त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करीत असतात. तरुणांची ही आवड पाहून सोशल मीडिया वरील प्रेक्षकांनी त्यांची वाह …वाह केली. त्यांनी सादर केलेल्या रील आणि व्हिडिओच्या माध्यमातून उत्साह आणि उल्हास दाखविला. आता कार्तिक कोळपे आणि त्यांच्या मित्रांनी आपल्या परिसरातील प्रश्न मांडण्यासाठी मनोरंजनात्मक रित्या रील बनवायला सुरुवात केली आहे. त्यांनी नुकताच पुसदचे रस्ते हे खड्डेमय झाले आहे आणि वर्षानुवर्षे या खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे परंतु याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व नगर पालिका प्रशासन डोळेझाक करीत असल्याने या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी “समृद्धी महामार्ग विकत घ्यायचा” असा व्हिडिओ तयार करून तो रिल च्या माध्यमातून इंस्टाग्राम वर पोस्ट केला आणि पाहता पाहता हा व्हिडिओ सर्वांच्या मोबाईलवर पोहोचला. आपल्यातीलच हा प्रश्न असल्याने पुसदकरांनी हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात पसरवण्यासाठी आपापल्या परीने शेअर केला. आणि त्यामुळेच की काय सुभाष चौक ते वसंतराव नाईक चौकाचे बांधकामाला सुरुवात झाली.

त्याचप्रमाणे शिवाजी वार्डातील ऋषिकेश जोगदंडे यांनी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुसद तालुक्यातील समस्या मांडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कुठेही कोणताही प्रश्न उद्भवला की जनतेकडून ऋषिकेश यांना फोन जातो आणि प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन ऋषिकेश जोगदंडे त्या समस्या संबंधी संबंधितांना प्रश्न विचारून सत्य बाहेर आणून समस्या मार्गी लावण्यासाठी जागृतीच्या दृष्टीने व्हिडिओ प्रसारित करून प्रयत्नरत असतात. त्यांनी नुकताच मुख्य रस्त्यावर तळे साचल्याचे पाहून आमदार, नगरसेवक व खासदार यांचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष असल्याचे आपल्या गीता द्वारे सादर करून लोकांचे मन जिंकले आहे. युवकांचा या सोशल मीडियाचा योग्य वापर होत असल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कुंभकर्णी झोपेतून जागी होतील असा आशावाद यानिमित्ताने पुसदकरांना होऊ लागला आहे. त्यामूळे सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असलेले व आपल्या अनोख्या आंदोलनातून भ्रष्टाचारासह विकासासाठी कार्य करणारे साकिब शाह व रुग्णसेवेतून आपल्या समाजकार्याची सुरुवात करणारे व आदिवासी समाजासह इतरही समाजाच्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी सदा अग्रेसर भूमिका घेणारे बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारोती भस्मे यांनी या नवयुवक तरुणांच्या समस्या मांडण्याच्या युक्ती च्या विचाराचा आदर सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. आज 11 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी चार वाजता चे दरम्यान पुसद येथील मुखरे चौकामध्ये कार्तिक कोळपे आणि त्यांचे मित्र मंडळातील अशू पौळ, सौरव इंगळे, आदर्श जाधव व रोहित बनसकर तसेच ऋषिकेश जोगदंडे यांचा शाल, बुके देऊन सार्वजनिक ठिकाणी सत्कार सन्मान करून पुसदकरांच्या वतीने पुसदच्या विकासासाठी हातभार लावण्याच्या कार्याला शुभेच्छा देऊन अशा कार्यात आम्ही आपल्या सोबत असल्याच्या दिलासा शहा आणि भस्मे यांनी त्यांना दिला आहे. अशा सार्वजनिक ठिकाणी केलेल्या सत्कारामुळे कार्तिक व त्यांचे मित्र मंडळ आणि ऋषिकेश जोगदंडे हे भारावून गेले असून त्यांनी याबद्दल आभार व्यक्त करीत यानंतर पुसदकरांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी लोक जागृती चे कार्य जोमाने चालू ठेवीन असा विश्वास व्यक्त केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….